शिवसेनेत लबाडांची फौज; विदर्भाशी काही देणे-घेणे नाही, असे म्हणत शिंदेंनी धरला ‘हात’...

शिवसेनेला विदर्भाशी काही देणे-घेणे नसल्याचे दिसून येत आहे. सर्वत्र लबाड लोकांची फौज शिवसेनेत तयार झालेली आहे. यात आपली घुसमट होत होती. म्हणून मी शिवसेनेचा त्याग करून काँग्रेसचा मध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला, असे अशोक शिंदे म्हणाले.
शिवसेनेत लबाडांची फौज; विदर्भाशी काही देणे-घेणे नाही, असे म्हणत शिंदेंनी धरला ‘हात’...
Ashok Shinde Hinganghat

हिंगणघाट (जि. वर्धा) : शिवसेनेचे उपनेते, माजी राज्यमंत्री आणि तीन वेळा आमदार राहिलेले अशोक शिंदे Former minister of state and three terms MLA Ashok Shinde यांनी पक्षातील गटबाजीला कंटाळून कॉंग्रेसमध्ये Congress प्रवेश घेतला आहे. काल मुंबईतील कॉंग्रेसच्या टिळक भवनात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले State President of congress Nana Patole यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेला Shivsena जय महाराष्ट्र केला. नाना पटोले यांच्या रोज नव्या वक्तव्यांमुळे महाविकास आघाडीत धुसफुस सुरू झाल्याचे बोलले जात असतानाच शिंदेंचा कॉंग्रेस प्रवेश म्हणजे शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे. 

\ \

शिवसेनेला विदर्भाशी काही देणे-घेणे नसल्याचे दिसून येत आहे. सर्वत्र लबाड लोकांची फौज शिवसेनेत तयार झालेली आहे. यात आपली घुसमट होत होती. म्हणून मी शिवसेनेचा त्याग करून काँग्रेसचा मध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला, असे अशोक शिंदे म्हणाले. अमरावतीचे माजी खासदार अनंत गुढे यांना जेव्हापासून वर्धा जिल्ह्‍याचे संपर्क प्रमुख बनवण्यात आले, तेव्हापासून जिल्ह्यात दोन गट पडले होते. मागच्याच आठवड्यात मंत्री उदय सामंत यांच्यासमोरच दोन गटांतील शिवसैनिकांनी राडा केला होता. एका ज्येष्ठ शिवसैनिकाने संपर्क प्रमुखाच्या कानाखाली वाजवण्याचाही प्रकार घडला होता. 

या घटनेनंतर अशोक शिंदे शिवसेनेत थांबणार नाहीत, असे बोलले जात होते. शिंदे आणि त्यांच्या समर्थकांना पक्षात स्थान राहिले नव्हते. या सर्व परिस्थितीला वैतागून अखेर त्यांनी शिवबंधन तोडले. हिंगणघाट विधानसभा तसेच जिल्ह्याच्या राजकारणात अशोक शिंदे यांचा मागील ३० वर्षांपासून दरारा आहे. ते शिवसेनेचे उपनेते होते. तसेच ते शिवसेनेकडून तीन वेळा विधानसभेवर निवडून गेले होते. शिवाय युती काळात त्यांनी राज्यमंत्री पदही भूषविले आहे. जिल्ह्याच्या राजकारणात संपर्कप्रमुख म्हणून माजी खासदार अनंत गुढे यांचा प्रवेश झाल्यानंतर या दोघांत वर्चस्वावरून वाद वाढला होता. जिल्ह्यातील शिवसेनेच्या निर्णयात अशोक शिंदे यांना डावलण्याचा प्रकार सुरू झाला. 

अलीकडेच भाजपमधून ११ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश घेतला होता. ही बाब माजी आमदार शिंदे यांच्यापासून दूर ठेवण्यात आली होती. या कारणाने नाराज असलेल्या माजी आमदार शिंदे यांनी काँग्रेसचा हात धरला. स्थानिक विधानसभा क्षेत्रात काँग्रेसही अनुभवी नेतृत्वाच्या शोधात होती. माजी आमदार अशोक शिंदे यांच्या काँग्रेस प्रवेशाने काँग्रेसला बळ मिळाले आहे.
Edited By : Atul Mehere

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in