खडसेंचे भवितव्य ठरवणारा अहवाल सकाळी गहाळ झाला अन् सायंकाळी सीएम कार्यालयात सापडला - Zoting committee report found in CM Uddhav Thackerays office | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

खडसेंचे भवितव्य ठरवणारा अहवाल सकाळी गहाळ झाला अन् सायंकाळी सीएम कार्यालयात सापडला

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 जुलै 2021

सक्तवसुली संचानालयाने (ईडी) राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्याभोवतीचा फास आवळत चालवला आहे.

मुंबई : भोसरीतील कथित जमीन गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचानालयाने (ईडी) राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्याभोवतीचा फास आवळत चालवला आहे. त्यातच या प्रकरणाच्या चौकशीचा झोटिंग समितीचा अहवाल गहाळ झाल्याची बातमी येऊन धडकली. त्यानंतर दिवसभर या अहवालाची शोधाशोध घेतल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयात सापडल्याचे समजते. (Zoting committee report found in CM Uddhav Thackerays office)

भोसरीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी काही दिवसांपूर्वीच खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली आहे. त्यानंतर खडसे यांचीही सुमारे नऊ तास चौकशी करण्यात आली. या प्रकरणात ईडीकडून पुराव्यांची जुळवाजुळव सुरू असतानाच झोटिंग समितीचा अहवाल गहाळ झाल्याचे वृत्त समोर आले. त्यामुळं राजकीय वर्तुळात राजकीय चर्चांना उधाण आले. भाजपनेही हा अहवाल सरकारनेच जाणीवपूर्वक गहाळ केल्याचा आरोप केला. 

हेही वाचा : बनावट गुणपत्रिकेवर पत्तीला सरपंच केलेेले भाजप आमदार तुरूंगात

मंगळवारी दिवसभर या अहवालाची शोधाशोध सुरू होती. अखेर सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयात हा अहवाल सापडला. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे मुख्यमंत्र्यांना हा अहवाल सादर करणार असल्याचे समजते. त्यामुळे सध्या ईडीकडून सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर हा अहवाल खडसेंसाठी महत्वाचा मानला जात आहे.

खडसे यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2016 मध्ये झोटिंग समिती नियुक्त केली. या समितीने आरोपांची चौकशी करून 30 जून 2017 रोजी आपला गोपनीय अहवाल सरकारला सादर केला. या प्रकरणात खडसे यांनी मंत्रिपद गमवाले लागले आहे. भाजप नेत्यांवर टीका करत त्यांनी काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. 

काय आहे प्रकरण?

खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे व जावई गिरीश चौधरी यांनी 2016 मध्ये भोसरी येथील जमीन खरेदी केली आहे. मूळ जमीन मालकाकडून ही जमीन 3 कोटी 75 लाख रुपयांना घेण्यात आली.ही जमीन एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या व त्यांच्या मालकीच्या जमिनीचे हे दोघे मालक झाले. याच प्रकरणाची चौकशी सुरू झाल्यानंतर खडसे यांना महसूल मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख