नानांनी स्वबळाची भाषा केल्यामुळे सेना, राष्ट्रवादीला कापरं भरलंय... - shivsena and bjp are in dilemma because nana said they fight alone | Politics Marathi News - Sarkarnama

नानांनी स्वबळाची भाषा केल्यामुळे सेना, राष्ट्रवादीला कापरं भरलंय...

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 13 जुलै 2021

आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीच काय ते सांगावे. ते इतके का घाबरलेले आहेत, की त्यांना नाना पटोलेंवर पाळत ठेवण्याची वेळ आली आहे. त्यांच्याच आघाडीमधील सहकारी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांची त्यांनी इतकी धास्ती का घेतली?

नागपूर : काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले State president of congress Nana Patole यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यापासून महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काॅंग्रेस NCP आणि शिवसेनेला Shivsena कापरं भरलं आहे. त्यांना जेवण धकत नाहीये, त्यांना पाणीदेखील पिता येत नाहीये, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis आज येथे म्हणाले. 

बुधवारी पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या मनोज ठवकर यांच्या शारदा नगर येथील घरी फडणवीसांनी आज सांत्वनपर भेट दिली. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना ते म्हणाले, नाना पटोलेंनी स्वबळाची भाषा केल्यापासूनच शिवसेना राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्यांचे रंग उडाले आहेत. हे दोन्ही पक्ष अतिषय घाबरलेल्या अवस्थेत दिसत आहेत. त्यातल्या त्यात माझ्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केल्यावर तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पायाखालची वाळुच सरकलेली आहे. 

महाविकास आघाडित बिघाडी झाली का, या प्रश्नाचे उत्तर देताना फडणवीस म्हणाले, याबाबतीत आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीच काय ते सांगावे. ते इतके का घाबरलेले आहेत, की त्यांना नाना पटोलेंवर पाळत ठेवण्याची वेळ आली आहे. त्यांच्याच आघाडीमधील सहकारी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांची त्यांनी इतकी धास्ती का घेतली की, त्यांना असे करण्याची वेळ आली. याबद्दल मी काय सांगणार, असा प्रतिप्रश्न फडणवीस यांनी केला. 

हेही वाचा : देवेंद्र फडणवीस म्हणाले, सीआयडी चौकशी लावून सीपींनी योग्यच केले; पण... 

Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख