देवेंद्र फडणवीस म्हणाले, सीआयडी चौकशी लावून सीपींनी योग्यच केले; पण... 

सीआयडीच्या पथकाने या प्रकरणाचे दस्तऐवज ताब्यात घेतले असून तपास सुरू केला आहे. तरीही मनोज ठवकर यांना मारहाण करणाऱ्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चौकशी होईपर्यंत निलंबित ठेवले पाहिजे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, सीआयडी चौकशी लावून सीपींनी योग्यच केले; पण... 
Devendra Fadanvis Warning

नागपूर : पोलिसांनी केलेल्या बेदम मारहाणीत दिव्यांग मनोज हरिभाऊ ठवकर Manoj Haribhat Thavkar (वय ३५ रा.शारदा चौक) याचा मृत्यू झाला, असा आरोप नातेवाइकांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा पारदर्शक तपास व्हावा, यासाठी हा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपविण्यात आला आहे. सीपींनी सीआयडीकडे तपास सोपवून योग्यच केले आहे. पण दोषींची बदली करून चालणार नाही, devendra fadanvis said the cp did right job by conduction cbi enquiry but  तर त्यांना निलंबित केले पाहिजे, असे विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis म्हणाले.

आज मनोज ठवकरच्या घरी भेट देऊन फडणवीसांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी ते म्हणाले, मारहाण करणारे पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची केवळ बदली करून होणार नाही, तर त्यांना निलंबित केले पाहिजे. ठवकर कुटुंबातील एका सदस्याला नोकरी दिली पाहिजे. या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी, यासाठी आम्ही राज्य सरकारकडे करणार आहोतच. पण भारतीय जनता पक्षातर्फे तातडीची २ लाख रुपयांची मदत आम्ही देणार आहोत. असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. पोलिस विभागात शिस्त असलीच पाहिजे. जे गुन्हे चालान करण्यासारखे आहेत, तेथे मारहाण होता कामा नये. लॉकडाऊनच्या काळात राज्यात १४ टक्के गुन्हे वाढले आहेत. वाढत्या गुन्हेगारीवर वचक ठेवण्याचे काम सरकारने केले पाहिजे. 

सीआयडीच्या पथकाने या प्रकरणाचे दस्तऐवज ताब्यात घेतले असून तपास सुरू केला आहे. तरीही मनोज ठवकर यांना मारहाण करणाऱ्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चौकशी होईपर्यंत निलंबित ठेवले पाहिजे. नागरिकांच्या लहान लहान चुकांसाठी जीव जाईपर्यंत अशी बेदम मारहाण करणे कदापिही योग्य नाही. यामुळे प्रशासनाबद्दल नागरिकांमध्ये दहशत निर्माण होते. पोलिस प्रशासन आणि नागरिकांमधील संबंध चांगले असणे, सामाजिक वातावरण सुदृढ असल्याचे लक्षण आहे. असे फडणवीस यावेळी म्हणाले. 

असे आहे प्रकरण...
बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास पारडी चौकात नाकाबंदीदरम्यान पोलिस वाहनचालकांची तपासणी करीत होते. मनोज व त्याचा साथीदार (एमएच-४९-एएफ-५१११) या क्रमांकाच्या मोपेडेने जात होता. पोलिसांना बघताच मनोजचा साथीदार पळाला. पोलिस उपनिरीक्षक मुकेश ढोबळे यांनी मनोजला मोपेड थांबविण्याचा इशारा केला. त्याने न थांबता वेग वाढवला. पीएसआय मुकेश यांनी मोपेडच्या मागील करिअर पकडले. मनोज याने सुमारे ५० फुटांपर्यंत मुकेश यांना फरफटत नेले आणि नंतर मनोज पळून गेला. पीएसआयने दोन पोलिस कर्मचाऱ्यांना बोलावले आणि बाईकने त्याचा पाठलाग केला. मनोजला काही अंतरावर पकडले आणि जबर मारहाण केली. 

दरम्यान मनोज दिव्यांग असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी मनोजला पोलिस स्टेशनमध्ये नेले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. जवळपास दीड तास मनोज पोलिस ठाण्यात बसून होता. त्याला मारहाण झाल्यामुळे श्‍वास घेण्यास त्रास होत होता. काही वेळातच तो खाली कोसळला. पोलिसांनी त्याला भवानी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी मारहाण केल्यानेच मनोजचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत नागरिकांनी भवानी हॉस्पिटलला घेराव घातला होता. 

शवविच्छेदनाचे चित्रीकरण 
गुरुवारी मेयो हॉस्पिटलमध्ये मनोजचे शवविच्छेदन करण्यात आले. त्याचे चित्रीकरणही करण्यात आले. पोलिसांनी घटनेची माहिती पोलिस महासंचालक कार्यालयाला दिली. महासंचालकांनी या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्याचे निर्देश दिले. त्यानंतर गुरुवारी दुपारी सीआयडीच्या पथकाने प्रकरणांशी संबंधित दस्तऐवज ताब्यात घेतले. या प्रकरणाची माहिती मानवाधिकार आयोगालाही देण्यात आली आहे. 

हेही वाचा : राज्यातील बहुतांश दलाल हे राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे समर्थक, बावनकुळेंचा घणाघाती आरोप...
 
पीएसआयसह तिघांची तडकाफडकी बदली 
पारडीतील घटनेची गंभीर दखल घेत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलिस उपनिरीक्षकासह मुकेश ढोबळेसह तिघांची तडकाफडकी पोलिस नियंत्रण कक्षात बदली केली. पीएसआय मुकेश ढोबळे, शिपाई नामदेव चरडे व आकाश शहाणे, अशी बदली करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या तिघांचीही भूमिका तपासण्यात  
येणार आहे. 
Edited By : Atul Mehere

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in