सचिन वाझेंच्या व्हॉट्सॲप स्टेटसबाबत गृहमंत्री म्हणाले, मी संपूर्ण माहिती घेतोय… - regarding sachin wazes whatsapp states the home minister said taking information | Politics Marathi News - Sarkarnama

सचिन वाझेंच्या व्हॉट्सॲप स्टेटसबाबत गृहमंत्री म्हणाले, मी संपूर्ण माहिती घेतोय…

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 13 मार्च 2021

शुक्रवारी वाझे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. सत्र न्यायालयात हा अर्ज करण्यात आला आहे. त्याची पुढील सुनावणी 19 मार्चला होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्या सुनावणीच्या आधी न्यायालय एटीएसकडून याप्रकरणाची माहिती घेण्याची शक्यता आहे. गृहमंत्री अनिल देशमुख माहिती घेतल्यानंतर काय प्रतिक्रिया देतात, याकडे माध्यमांचे लक्ष लागले आहे. 

नागपूर : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात अडचणीत सापडलेले पोलिस अधिकारी सचिन वाझेंच्या व्हॉट्सअॅप स्टेटसनं खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकारी त्यांच्या संपर्कात आहेत. त्यांनी काही चुकीचं पाऊल उचलू नये, यासाठी त्यांच्याशी वरिष्ठांनी संपर्क केला आहे. ‘जगाला गुड बाय म्हणायची वेळ आलीय, आता माझ्याकडे पेशन्स नाहीत’, अशा आशयाचं व्हॉट्सअॅप स्टेट्स सचिन वाझेंनी ठेवलं आहे. याबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना विचारणा केली असता, ‘मी आत्ताच मुंबईहून नागपुरामध्ये पोहोचलो, संपूर्ण माहिती घेतोय.’, येवढेच उत्तर त्यांनी दिले. या विषयावर अधिक बोलण्याचे त्यांनी टाळले. 

राज्याचे अर्थसंकप्लीय अधिवेशन अर्ध्यापेक्षा जास्त सचिन वाझे याच विषयावर गाजले. विरोधकांनी या मुद्यावर सरकारला नामोहरम करून सोडले. अधिवेशन संपल्यानंतर दोनच दिवसांत सचिन वाझेंनी अशा पद्धतीचं व्हॉट्सॲप स्टेट्स ठेवल्यामुळे मोठी खळबळ उडाली. सचिन वाझेंचा अंतरिम अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. त्यांच्या अटकपुर्व जामिनावर १९ मार्च रोजी होणार सुनावणी होणार आहे. सचिन वाझे यांना अटकेपासून संरक्षण नसल्याने त्यांचा गुन्ह्यात सहभाग आढळल्यास त्यांच्यावर अटकेची कारवाईसुद्धा होऊ शकते. 

वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी अटकेच्या भीतीने अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. मनसुख हिरेन यांची पत्नी विमला हिरेन यांनी दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) दिलेल्या तक्रारीत सचिन वाझे यांच्याविरोधात आरोप केल्यानंतर शुक्रवारी वाझे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. सत्र न्यायालयात हा अर्ज करण्यात आला आहे. त्याची पुढील सुनावणी 19 मार्चला होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्या सुनावणीच्या आधी न्यायालय एटीएसकडून या प्रकरणाची माहिती घेण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : पोलिस आयुक्त सचिन वाझेंशी काय चर्चा करतात?

मनसुख हिरेन मृत्युप्रकरणी सचिन वाझे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. पण त्यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला असल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. वाझेंना अटक करण्याची मागणी भाजपने  केली आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. याबाबतचे टि्वट सोमय्या यांनी केलं आहे. सचिन वाझे यांनी अटकेच्या भीतीने अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. मनसुख हिरेन यांची पत्नी विमला हिरेन यांनी दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) दिलेल्या तक्रारीत सचिन वाझे यांच्याविरोधात आरोप केल्यानंतर शुक्रवारी वाझे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. सत्र न्यायालयात हा अर्ज करण्यात आला आहे. त्याची पुढील सुनावणी 19 मार्चला होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्या सुनावणीच्या आधी न्यायालय एटीएसकडून याप्रकरणाची माहिती घेण्याची शक्यता आहे. गृहमंत्री अनिल देशमुख माहिती घेतल्यानंतर काय प्रतिक्रिया देतात, याकडे माध्यमांचे लक्ष लागले आहे. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख