गुंड रणजीत सफेलकरला अनवाणी फिरवले, निमगडे हत्याकांडातील मोठे मासे अडकणार...

गर्वाचे घर खालीस्वतः गॅंगस्टर असल्याचे भासवत रणजीत सफेलकर हा खंडणी, भूखंड हडपणे, धमकी देणे आणि वसुली करण्याचे काम करीत होता. त्याची गुन्हेगारीत चांगलीच दहशत होती. काही बड्या राजकीय व्यक्तींचाही त्याच्या डोक्यावर हात होता. त्यामुळे तो गुन्हेगारीत सक्रिय राहत होता.
Ranjeet Safelkar
Ranjeet Safelkar

नागपूर : कुख्यात गुंड मनीष श्रीवासच्या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार गॅंगस्टर रणजीत सफेलकरला अनवाणी पायाने, बरमुड्यावरच पोलिसांनी न्यायालयात हजर केले. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्‍यांनी ७ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांच्या धाडसाचे शहरभर कौतुक होत आहे. सफेलकरच्या अटकेने निमगडे हत्याकांडातील अनेक मोठे मासे गळाला लागणार असल्याचे बोलल्या जात आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ मार्च २०१२ मध्ये महिलेशी मौजमजा करण्याचे आमिष दाखवून मास्टरमाईंड आरोपी रणजीत सफेलकर, शरद ऊर्फ कालू हाटे, भरत हाटे आणि त्यांच्या साथीदारांनी मनीषचे अपहरण केले. पवनगाव (धारगाव) येथील एका घरात आरोपींनी मनीषचा गळा चिरून खून केला. त्याचा मृतदेह कामठी येथे आणून त्याच्या शरीराचे तुकडे केले. चारचाकी वाहनाने मनीषच्या मृतदेहाचे तुकडे करई घाटात नेऊन फेकले. या प्रकरणी पोलिसांनी शरद आणि भरत हाटे यांना अटक केली. दोन्ही आरोपींची सखोल चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली. त्याचप्रमाणे ज्या घाटात मृतदेहाचे तुकडे फेकले ते ठिकाण सुद्धा आरोपींनी दाखविले. ज्या सेंट्रो कारमधून मनीषच्या मृतदेहाचे तुकडे नेण्यात आले ती कार सुद्धा पोलिसांनी जप्त केली आहे. फरार रंजित सफेलकरलाही अटक करण्यात आली. पोलिसांना चकमा देऊन सफेलकर भंडाऱ्याकडे गेला होता. त्याची बॅग प्रवासात हरवली. त्यात आढळलेल्या पॅनकार्ड, एटीएम आदींद्वारे त्याचा तपास करण्यात आला. 

काल सफेलकरला नागपूर शहर गुन्हे शाखा पोलिसांनी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी महेश जोशी यांच्यासमक्ष हजर केले. तसेच प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी सफेलकरला ११ दिवसांसाठी पोलिस रिमांडवर द्यावे, अशी विनंती केली. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्‍यांनी पोलिसांचे म्हणणे ऐकून घेत सफेलकरला ७ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी मंजूर केली आहे. सफेलकर हा एकनाथ निमगडे हत्याकांडाचाही मास्टरमाईंड आहे. त्याला श्रीवास हत्याकांडाचा तपास झाल्यानंतर सीबीआयच्या ताब्यात देणार असल्याची माहिती आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, गुन्हे शाखेचे गजानन शिवलिंग राजमाने यांच्या मार्गदर्शनात पीआय संदीपान पवार यांच्या पथकाने केली. 

गर्वाचे घर खाली 
स्वतः गॅंगस्टर असल्याचे भासवत रणजीत सफेलकर हा खंडणी, भूखंड हडपणे, धमकी देणे आणि वसुली करण्याचे काम करीत होता. त्याची गुन्हेगारीत चांगलीच दहशत होती. काही बड्या राजकीय व्यक्तींचाही त्याच्या डोक्यावर हात होता. त्यामुळे तो गुन्हेगारीत सक्रिय राहत होता. आलिशान कारमध्ये फिरणाऱ्या रणजीतला आज गुन्हे शाखा पोलिसांनी अनवाणी आणि बरमुड्यावर न्यायालयात हजर केल्याने त्याचे गर्वहरण झाले.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com