शरद पवार जेव्हा आपलेच रुग्णालयातले छायाचित्र पाहतात! 

शरद पवारांच्या कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी एक छायाचित्र शेअर केलेहोते. पेपरमध्ये छापून आलेले तेच छायाचित्र पवार न्याहाळून पाहत असल्याचे सुळे यांनी शेअर केलेल्या नव्या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
 Sharad Pawar .jpg
Sharad Pawar .jpg

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या पित्ताशयाच्या शस्त्रक्रियेमुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल आहेत. त्यांना नियमीत वर्तमानपत्र वाचण्याची आवड आहे. हे काम त्यांचे नित्यनियमाने रुग्णालयातही सुरु आहे. असे सांगत शरद पवारांच्या कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी बुधवारी एक छायाचित्र शेअर केले होते. पेपरमध्ये छापून आलेले तेच छायाचित्र पवार न्याहाळून पाहत असल्याचे सुळे यांनी शेअर केलेल्या नव्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. When Sharad Pawar sees his own hospital photos

सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी सकाळी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून समर्थकांची पवार यांच्याशी भेट घडवून दिली. या व्हिडीओतही शरद पवार रुग्णालयातील बेडवर बसून पेपर वाचताना दिसत आहेत. पवार स्वतःचे छायाचित्र पाहत असताना 'योगायोगाने हाच फोटो लावलाय' असे सुळे म्हणाल्याचे ऐकू येते. 'एकदा गुड मॉर्निंग म्हणता का? सगळे बघतायत तुमच्याकडे' अशी विचारणाही सुळे यांनी पवार यांना केली. तेव्हा पवारांनी सर्वांना हलकेसे स्माईल दिले.

पवार यांच्यावर मंगळवारी रात्री ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. पवार यांना पोटदुखीचा त्रास होत असल्यामुळे रुग्णालायत दाखल करण्यात आले होते. त्यानंतर डॅाक्टरांनी शस्त्रक्रिया केली. सध्या पवार यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आणि चांगली आहे. 

पवार (Sharad Pawar) यांना रुग्णालयात हलविल्याची बातमी आल्यानंतर अनेकांची चिंता वाढली होती. मात्र, पित्ताशयातील खड्यामुळे त्यांना त्रास होत असल्याचे सुप्रिया सुळे यांनी नमूद केल्यानंतर काही प्रमाणात लोकांनी निःश्वास सोडला होता. आज सकाळी सुळे (Surpriya Sule)  यांनी फेसबुकच्या माध्यमातून सर्वांना पवारांची भेट घडवून आणली. When Sharad Pawar sees his own hospital photos

दरम्यान, पवार यांना पोटदुखीच्या त्रासामुळे सोमवारी रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यांची तपासणी केल्यानंतर बुधवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, पोटात दुखत असल्यामुळे त्यांना मंगळवारी सायंकाळी रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. 

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com