या मातीतली माणसं ब्रिटिशांना घाबरली नाहीत, या तुटपुंज्यांना काय घाबरणार…

जगणे मुश्‍कील केलेल्या या सरकारला लोक धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत आणि कॉंग्रेस या देशातील सामान्य जनतेसोबत उभी आहे. त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.
Sunil Kedar
Sunil Kedar

नागपूर : देशात काही विशिष्ट लोकांची हेरगिरी केली जात आहे. केंद्र सरकार लबाडीची आणि चोरी चकारीची कामे करीत आहे. सत्तेचा दुरुपयोग करून लोकांना दहशतीखाली ठेवण्याचा उपक्रमच सरकारने सुरू केलेला आहे. पण सरकारने हे विसरू नये, की या मातीत जन्मलेली माणसं ब्रिटिशांना घाबरली नाहीत, तर या तुटपुंज्यांना काय घाबरणार, The people of this land are not afraid of the british what little once afraid of असे म्हणत राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार Minister Sunil Kedar यांनी केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबोल केला. 

युवक कॉंग्रेसतर्फे केंद्र सरकारच्या विरोधात महागाई, पेगासस हेरगिरी प्रकरणाच्या विरोधात आणि शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ येथील संविधान चौकात हल्लाबोल करण्यात आला. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना सुनील केदार म्हणाले, लोकशाहीमध्ये सरकार चालवायची असेल, टिकवायची असेल तर लोकांचे प्रेम मिळवून त्यांच्या विश्‍वासावर सरकार टिकवावी लागते. अशा प्रकारे देशातील लोकांवर दहशत पसरवून सरकार चालवता येत नाही. केंद्र सरकारने सध्या जे काही चालवले आहे, त्याची फळे त्यांना लवकरच भोगावी लागतील. 

२०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत केंद्रातील भाजप सरकारला घरचा रस्ता धरावा लागणार आहे. त्यासाठी त्यांनी आत्तापासूनच मानसिक तयारी केली पाहिजे. नाहीतर महाराष्ट्रातील सत्ता गेल्यानंतर भाजपचे नेते जसे सैरभैर झाले, तसेच हाल त्यांच्या केंद्रातील नेत्यांचे होणार आहेत. कारण जनतेला घाबरवून तुम्ही सत्ता चालवू शकत नाही. या देशातील लोक ब्रिटिशांना घाबरले नाहीत. तर त्यांची सत्ता उलथवून लावली आणि त्यांना घरचा रस्ता दाखवला. अगदी त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या सरकारलादेखील जनता घरचा रस्ता दाखवणार आहे. 

महागाई गेली आटोक्याबाहेर…
केंद्र सरकारच्या मनमानी कारभारामुळे महागाई आटोक्याबाहेर गेली आहे. सामान्य माणसाचे परिवार उद्ध्वस्त झाले आहेत. सामान्यांनी कसे जगावे, आपल्या मुलांना कसे पोसावे, शिक्षण कसे द्यावे, मुलींचे लग्न कसे करावे, येणाऱ्या अपत्यांचे भविष्य कसे घडवावे, असे एक ना अनेक प्रश्‍न जनतेसमोर आ वासून उभे ठाकले आहेत. जगणे मुश्‍कील केलेल्या या सरकारला लोक धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत आणि कॉंग्रेस या देशातील सामान्य जनतेसोबत उभी आहे. त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, याही परिस्थितीत जनतेला दिलासा कसा देता येईल, यासाठी आम्ही काम करत आहोत, असेही मंत्री सुनील केदार आज म्हणाले. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com