राजकीय गणिताची जुळवाजुळव झाल्यावर होणार विधान परिषद निवडणूक ?

गेल्या वेळी निवडणूक अविरोध झाली होती. यंदा मात्र निवडणूक होणार असल्याचे चित्र आहे. याकरिता सध्या तरी भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे तर कॉंग्रेसकडून राजेंद्र मुळक यांची नावे चर्चेत आहे.
Voting
Voting

नागपूर : ओबीसीचे राजकीय आरक्षण OBC's policical reservation आणि कोरोनाचे कारण पुढे करत सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ६ महिन्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेच्या एका जागेसाठी पुढील वर्षी जानेवारीत निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीत महानगर पालिका, जिल्हा परिषद व नगर परिषदेचे सदस्य हे मतदान करतात आणि पण फेब्रुवारी २०२२ मध्ये महानगरपालिकेची निवडणूक आहे. राजकीय पक्षांची गणिते अजून पूर्णपणे जुळलेली नाहीत. त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. Legislative council elections likely to be postponed.

आयोगाकडून सहा महिने आधी निवडणुकीबाबत तयारीच्या सूचना देण्यात येतात. परंतु अद्यापही जिल्हा प्रशासनाला कोणत्याही सूचना सध्या या मतदारसंघाचे भाजपचे गिरीश व्यास हे प्रतिनिधित्व करीत आहेत. स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर सदस्यांची निवडणुकीच्या माध्यमातून निवड होते. यात महानगर पालिका, जिल्हा परिषद व नगर परिषदेचे सदस्य हे मतदान करतात. निवडणूक अर्थचक्राभोवती फिरत असल्याचे सांगण्यात येते. मागील निवडणुकीत भाजपचे गिरीश व्यास हे अविरोध निवडून आले होते. त्यावेळी महानगर पालिकेसह जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता होती. त्याचा फायदा त्यांना झाला होता. त्यापूर्वीच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे राजेंद्र मुळक यांचा विजय झाला होता. नियोजन विभागाकडून नुकताच आमदार निधी वितरित झाला. त्यात व्यास यांचा समाप्तीचा कार्यकाळ १ जानेवारी २०२२ दर्शविण्यात आला आहे. त्यामुळे त्यापूर्वीच निवडणूक होणे अपेक्षित असल्याचे सांगण्यात येते. 

गेल्या वेळी निवडणूक अविरोध झाली होती. यंदा मात्र निवडणूक होणार असल्याचे चित्र आहे. याकरिता सध्या तरी भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे तर कॉंग्रेसकडून राजेंद्र मुळक यांची नावे चर्चेत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपकडे बावनकुळे यांच्या व्यतिरिक्तही एक ते दोन नावे अजून आहेत. ते वेळेवर समोर येणार असल्याचे सांगण्यात येते. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सहा महिन्यांपूर्वी निवडणुकीसंदर्भातील सूचना येणे क्रमप्राप्त आहे. परंतु अद्याप कोणत्याही सूचना जिल्हा प्रशासनाला आलेल्या नाहीत. त्यामुळे ही निवडणूकही लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. 

राजकीय गणिताची जुळवाजुळव  ः-
-कोरोनामुळे सहा जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलल्या. 
-फेब्रुवारीत मनपा निवडणूक आहे. सध्या भाजपचे संख्याबळ जास्त आहे. शिवाय ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने जिल्हा परिषदेतील कॉंग्रेसचे संख्याबळ कमी झाले आहे. महानगर पालिका निवडणुकीत कॉंग्रेस- राष्ट्रवादीला संख्याबळ दुपटीच्या घरात जाण्याचा अंदाज आहे. 
- जिल्हा परिषद निवडणुकीनंतर या विधान परिषदेची निवडणूक होण्याची अंदाज व्यक्त होत आहे. 
-मनपा निवडणुकीनंतर परिषदेकरता निवडणूक होण्याची शक्यता.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com