‘लुटेरी दुल्हन’चे जुने प्रेम आले उफाळून, भोळेसाठी घेतली वकिलाची भेट... - the old love of luteri dulhan reutrned she meet with loyer for bhole | Politics Marathi News - Sarkarnama

‘लुटेरी दुल्हन’चे जुने प्रेम आले उफाळून, भोळेसाठी घेतली वकिलाची भेट...

अनिल कांबळे
बुधवार, 17 मार्च 2021

पीआय अरविंद भोळेवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्याशी प्रेमसंबंध असलेल्या काही महिलांनी ‘ती मी नव्हेच’ अशी भूमिका घेतली आहे. भोळेच्या दोन प्रेयसींचे संभाषण असलेली ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यात भोळेने कसे आपल्याला फसवून शोषण केले, याची आपबिती दोघीही एकमेकींना सांगत आहेत. 

नागपूर : कुख्यात लुटेरी दुल्हन प्रीतीने अनेकांना फसवले आहे. यामध्ये काही पोलिसांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येते. पण विधवेवर बलात्कार केलेला पोलिस निरीक्षक अरविंद भोळे याच्यासोबत तिचे जुने प्रेम आहे. भोळेवर गिट्टीखदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तिचे जुने प्रेम उफाळून आले आणि तिने धावपळ करीत वकिलाची भेट घेतली. जुन्या प्रियकराला या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी तिची धडपड सुरू झाली आहे. 

विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपुरात कार्यरत पोलिस निरीक्षक अरविंद भोळे याने गिट्टीखदानमधील विधवेला फेसबुकवरून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. बलात्कार करून तिचे अश्‍लील फोटो आणि व्हिडिओ काढले. एक लाख रुपये आणि ४ लाखांच्या सोन्याच्या बांगड्या भोळेने चोरून नेल्या. त्यानंतर महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल होताच भोळे नागपुरातून फरार झाला. पोलिस आयुक्तांनी त्याला निलंबित केले आहे. गिट्टीखदान पोलिस त्याला अटक करतील, या धाकाने त्याने अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरू केले. प्रियकर अडचणीत असल्याचे बघून त्याची जुनी प्रेयसी प्रीती सक्रिय झाली आहे. तिने नागपुरातील एका नामांकित वकिलाची भेट घेतली. भोळेच्या अटकपूर्व जामिनासाठी अर्ज, कागदपत्रे आणि शुल्क जमा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

दोन प्रेयसींची ऑडिओ क्लिप व्हायरल 
पीआय अरविंद भोळेवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्याशी प्रेमसंबंध असलेल्या काही महिलांनी ‘ती मी नव्हेच’ अशी भूमिका घेतली आहे. भोळेच्या दोन प्रेयसींचे संभाषण असलेली ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यात भोळेने कसे आपल्याला फसवून शोषण केले, याची आपबिती दोघीही एकमेकींना सांगत आहेत. 

हेही वाचा : कमल हासन तामिळनाडूतील सर्वात श्रीमंत उमेदवार... 

पोलिस अधिकाऱ्याच्या फ्लॅटची चर्चा 
भोळेने फ्रेंड्स कॉलनीतील फ्लॅटवर विधवा महिलेला ठेवले होते. तो फ्लॅट एका वादग्रस्त पोलिस अधिकाऱ्याने मोक्काचा आरोपी रोशन शेखकडून कमी पैशात विकत घेतला आहे. त्याबदल्यात त्या अधिकाऱ्याने शेखूला अनेक अवैध धंद्यांत मदत केली, तर काही प्रकरणांत कारवाईपासून वाचविले आहे. त्याला शेखूने आयफोनसुद्धा गिफ्ट केला आहे, अशी चर्चा आहे. भोळे प्रकरणात त्या अधिकाऱ्याचीही चौकशी होणार असल्याची माहिती आहे. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख