कमल हासन तामिळनाडूतील सर्वात श्रीमंत उमेदवार...  - Tamilnadu Assembly Elections 2021 Kamal Haasan is the richest candidate | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

कमल हासन तामिळनाडूतील सर्वात श्रीमंत उमेदवार... 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 17 मार्च 2021

कमल हासन यांच्यावर 49 कोटी 50 लाख रुपयांचे कर्ज आहे. 

कोइंबतूर : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीची रंगत वाढत आहे. काल अभिनेता कमल हासन यांनी दक्षिण कोइंबतूर  मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. कमल हासन यांचा मुकाबला भाजपच्या महिला महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष वनाथी श्रीनिवासन आणि कॉंग्रेसच्या मौर्य एस. जयकुमार यांच्याशी होणार आहे. कमल हासन हे एमएनएमच्या नेतृत्वाखालील तीन पक्षांच्या युतीमधून मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत.

मक्कल निधी मय्यम पक्षाचे (MNM) संस्थापक आणि प्रमुख कमल हासन (Kamal Haasan) यांनी 45 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीची जंगम मालमत्ता आपल्या शपथ पत्रात जाहीर केली आहे. कमल हासन यांनी शपथ पत्रात सांगितले आहे की, त्यांच्यावर 49 कोटी 50 लाख रुपयांचे कर्ज आहे. त्यांचा कोणीही जीवनसाथी किंवा आश्रित नाही. (Kamal Haasan is the richest candidate)

त्यांची जंगम मालमत्ता 45,09,01,476 कोटींची आहे. बीएमडब्ल्यू 730 एलडी आणि लेक्सस एलएक्स 570 या दोन वाहनांचा समावेश आहे, ज्यांची किंमत 3 कोटी 69 लाख रुपयांहून अधिक आहे. चेन्नईत त्यांच्या दोन निवासी इमारती आहेत. त्यांचे एकूण मूल्य 19.5 कोटी रुपये आहे. लंडनमधील अडीच कोटींच्या एकत्रित मालमत्तेची माहितीही त्यांनी दिली आहे.   

फडणवीस दोन आरोपींना पाठिशी घालत आहे..काँग्रेसचा आरोप...

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत मक्कल निधी मय्यम पक्षाने १५४ मतदारसंघातून आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. खुद्द कमल हासन कोइम्बतूर दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. तमिळनाडू विधानसभेत 234 आमदार असून सध्या एआयडीएमके आघाडीकडे 134 जागा आहेत. (Kamal Haasan is the richest candidate) डीएमके आणि काँग्रेसच्या आघाडीला 98 जागा मिळाल्या होत्या. तर भाजपला या राज्यात खाते खोलता आले नाही. मात्र, यावेळी भाजपने सत्ताधारी पक्षासोबत आघाडी केली आहे. त्यामुळे यावेळी भाजपला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. कमल हासन यांनी फेब्रुवारी 2018 मध्ये एमएनएमची स्थापना केली आहे

Edited  by :  Mangesh Mahale
   

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख