ओबीसी आरक्षण : महाविकास आघाडीतील तीन्ही पक्ष ठरवून वेगवेगळी नाटकं करत आहेत... - obc reservation the three patries of mahavikas alliance are doing different plays | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

ओबीसी आरक्षण : महाविकास आघाडीतील तीन्ही पक्ष ठरवून वेगवेगळी नाटकं करत आहेत...

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 16 जून 2021

कोरोना संक्रमणाचा काळ सुरू असल्यामुळे आम्ही आंदोलन केले नाही आणि सरकारमधले मंत्रीच आंदोलन करतात. हे सर्व सोडून मंत्र्यांनी रोज मंत्रालयात बसावे, रोज आढावा घ्यावा आणि एक महिन्याच्या आता डाटा तयार करून ओबीसींना आरक्षण द्यावे.

नागपूर : ओबीसी आरक्षणाचा OBC Reservation गुंता महाविकास आघाडी सरकारने Mahavikas Alliance Government स्वतःहून वाढविला आहे. सरकारमधील तिन्ही पक्ष आपापली वेगवेगळी नाटकं करून ओबीसी समाजाला मूर्ख बनवण्याचे काम करत आहे. पण ओबीसी समाज मूर्ख नाही, हे सरकारने लक्षात घ्यावे. आता आरक्षण दिले नाही, तर ओबीसी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकतील OBC will boycott the local body elections आणि सरकारमधील मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे Chandrashekhar Bawankule यांनी आज दिला. 

बावनकुळे म्हणाले, छगन भुजबळ कॅबिनेट मंत्री असूनही काही फायदा नाही. कारण त्यांचे तेथे काही चालत नाही. ओबीसी आयोग तयार करण्याच्या फाईलवर वर्ष उलटून गेले तरी मुख्यमंत्र्यांची सही होत नाही. त्यामुळे आरक्षणाच्या विषयाची पुरती वाट लागली आहे. ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार घोषणा करतात की, सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे आम्ही इम्पेरिकल डाटा तयार करणार आहोत आणि एक एक महिन्याच्या आत करणार आहोत. महिना उलटला तरी इम्पेरिकल डाटा तयार झालेला नाही. तिकडे छगन भुजबळ ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन काय करतात, ही सर्व महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष मिळून करत असलेली नौटंकी आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ आंदोलन करणार, कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार इम्पेरिकल डाटा तयार करण्याची भाषा करणार. पण करत नाहीत आणि यांनी हे केलेही तरी त्या फाईलवर मुख्यमंत्री सही करणार नाहीत. तिन्ही पक्ष ठरवून चांगली नौटंकी वठवत आहेत. पण या लोकांनी ओबीसी समाजाला मूर्ख समजण्याची चूक करू नये. राज्य सरकारने आता ही नाटकं थांबवावी आणि एका महिन्यात इम्पेरिकल डाटा तयार करावा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ओबीसींना आरक्षण द्यावे. सरकारने एका महिन्याची वेळ दिली होती. म्हणून भारतीय जनता पक्ष वाट बघत आहे. 

हेही वाचा : आठवडाभरात भागणार चंद्रपूर जिल्ह्यातील तळीरामांची तहाण...

कोरोना संक्रमणाचा काळ सुरू असल्यामुळे आम्ही आंदोलन केले नाही आणि सरकारमधले मंत्रीच आंदोलन करतात. हे सर्व सोडून मंत्र्यांनी रोज मंत्रालयात बसावे, रोज आढावा घ्यावा आणि एक महिन्याच्या आता डाटा तयार करून ओबीसींना आरक्षण द्यावे, अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही होऊ देणार नाही. ओबीसी समाज या निवडणुकांवर बहिष्कार टाकेल. महाविकास आघाडीचे सरकार हे ओबीसींवर अन्याय करणारे सरकार आहे. आरक्षण न मिळाल्यास या सरकारला ओबीसी समाज धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख