Liquor Glass
Liquor Glass

आठवडाभरात भागणार चंद्रपूर जिल्ह्यातील तळीरामांची तहाण...

१ एप्रिल २०१५ राेजी जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी लागू झाली. तब्बल सहा वर्षानंतर २७ मे २०२१ राेजी दारुबंदी उठविण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रींमंडळाने घेतला. ८ जुन २०२१ राेजी राज्यशासनाच्या गृह विभागाने एक अधिसूचना काढून दारुबंदी उठविण्याच्या निर्णयावर शिक्कामाेर्तब केले.

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी Chandrapur District उठविण्यासाठी खुप घमासान झाले. अखेर राज्य सरकारने State Government दारूबंदी उठविली. याचे स्वागत आणि विरोधही झाला. विरोधक काही हालचाली करतील, म्हणून येत्या आठवडाभरात जिल्ह्यात प्रत्यक्षात दारूविक्री सुरू होणार The sale of liquor will actually start in the district within a week असल्याचे उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात येत आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठविण्याच्या निर्णयाला सामाजिक कार्यकर्त्यांकडून न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते, अशी शक्यता गृहीत धरुन राज्य शासनाने उच्च न्यायालयाच्या राज्यातील तिनही  खंडपीठात कॅवेट दाखल केले आहै. दारुबंदी हटविण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयापासूनच दारुविक्रीचे दुकान सुरू हाेण्याची विक्रेते आणि तळीराम दाेघेही वाट बघत आहेत. या पार्श्वभूमीवर जुन्या परवान्यांचे नुतणीकरण आणि नवे परवाने देण्यासाठी आजपासून अर्ज स्वीकारणे सुरू झाले आहे.. येत्या सात दिवसांत प्रत्यक्षात जिल्ह्यात दारुविक्री सुरू हाेईल, असे उत्पादन शुल्क विभागाचे म्हणणे आहे.

 १ एप्रिल २०१५ राेजी जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी लागू झाली.  तब्बल सहा वर्षानंतर २७ मे २०२१ राेजी दारुबंदी उठविण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रींमंडळाने घेतला.   ८ जुन २०२१ राेजी  राज्यशासनाच्या गृह विभागाने एक अधिसूचना काढून दारुबंदी उठविण्याच्या निर्णयावर शिक्कामाेर्तब केले. राज्यातील सामाजिक कार्यकर्त्यांचा विराेध बघता या निर्णयाविराेधात  कुणीतरी न्यायालयाचे दार ठाेठावणार, अशी शक्यता गृहीत धरून शासनाने उच्च न्यायालयाच्या नागपूर, अौरंगाबाद आणि मुंबई खंडपीठात उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने कॅवेट दाखल केले आहे.
 

दारुबंदीनंतर उत्पादन शुल्क विभागाने सर्व परवाने ताब्यात घेवून गाेठविले हाेते.आजच्या घडीला जिल्ह्यात बार अॅन्ड रेस्टारंटचे ३१४, देशी दारु (किरकाेळ विक्री) ९८, बिअर शाॅपी ५० आणि  क्लबचे दाेन परवाने नुतणीकरणासाठी विचाराधीन आहेत. याशिवाय ठाेक विक्रेत्यांमध्ये  देशी दारु  पाच आणि विदेशी दारूचे तीन परवाने जिल्ह्यात आहे. वाॅईन शाॅपचे आधी २४ परवाने हाेते. दारुबंदीनंतर अनेकांनी परवाने दुसऱ्या जिल्ह्यात स्थलांतरीत केले.

आता केवळ ५ वाॅईन शाॅपचे परवाने जिल्ह्यात आहेत. नुतणीकरणासाठी २०२०-२०२१ या वर्षांचे शुल्क आकारले जाणार आहे. दरम्यान आजपासून जुन्या परवान्यांचे नुतणीकरण आणि नवे परवाने देण्यासाठी अर्ज स्वीकारले सुरू झाले. ३१ मार्च २०१५ पर्यंत जे परवाने सुरू हाेते. त्याच परवान्यांचा नुतणीकरणासाठी विचार केला जाणार आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या चंद्रपूर, राजुरा आणि वराेरा कार्यालयात अर्ज स्वीकारले जातील.

उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी अर्जात उल्ल्ेखित दारुविक्रीच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करतील. त्यानंतर तीन दिवसांत याचा अहवाल दिला जाईल. त्यानंतर दारुविक्रीचा नवा परवाना दिला जाईल. परवान्याचे नुतणीकरण केले जाईल. ही प्रक्रीया एका आठवड्याच्या आत पार पडेल. त्यामुळे येत्या आठवडाभरात चंद्रपूर जिल्ह्यातील दारुविक्री पुन्हा सुरु हाेईल, असे उत्पादन शुल्क विभागाने सांगितले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com