राऊत काहीही बोलत असतात, त्यांनी पोरखेळ करू नये; फडणवीसांचा पलटवार...

मराठा आरक्षणाच्या संदर्भात छत्रपती संभाजी राजे यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यांच्याशी २८ ला भेटणार आहे, असेही फडणवीस म्हणाले. राज्यपाल कार्यालयाने अद्याप नियुक्ती का केली नाही, याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.
Devendra Fadanvis - Sanjay Raut
Devendra Fadanvis - Sanjay Raut

नागपूर : विधान परिषदेतील राज्यपाल Bhagarsingh Koshyari नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीवरून सध्या महाविकास आघाडी सरकारमधील Mahavikas Aghadi Government पक्षांचे नेते आणि भाजप नेत्यांमध्ये BJP Leaders विविध आरोप प्रत्यारोप होत आहेत. यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत Shivsena's MP Sanjay Raut यांनी राज्यपालांवर टिका केली होती. यासंदर्भात येथील विमानतळावर देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis यांना माध्यम प्रतिनिधींनी विचारणा केली असता, राऊत काहीही बोलत असतात, त्यांनी पोरखेळ करू नये, असा पलटवार त्यांनी केला. 

विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या संदर्भात संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली होती. या संदर्भातील फाईल्स गायब झाल्या, त्या भुताने पळविल्या, असे राऊत म्हणाले होते. याकडे फडणवीस यांचे लक्ष वेधले असता, नामनिर्देशित सदस्यांसंदर्भात राजभवनच सांगू शकेल. हा विषय गंभीर असून तो न्यायप्रविष्ट आहे. त्या विषयाबाबत असे बोलणे म्हणजे पोरखेळ आहे. असे कोणी करू नये. राऊत काहीही बोलत असतात. त्यांच्या प्रत्येक वक्तव्यावर उत्तर दिलेच पाहिजे, असे नाही, असेही फडणवीस म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या संदर्भात छत्रपती संभाजी राजे यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यांच्याशी २८ ला भेटणार आहे, असेही फडणवीस म्हणाले. राज्यपाल कार्यालयाने अद्याप नियुक्ती का केली नाही, याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र वैधानिक विकास मंडळाच्या मुद्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारा आमदारांची नियुक्ती करा, चोवीस तासात मंडळांना मुदतवाढ देतो, असे विधानसभेत सांगून वादाला तोंड फोडले होते.

काय म्हणाले होते संजय राऊत ?
विधान परिषदेवरील १२ सदस्यांच्या नियुक्तीवर सामना अग्रलेखातून शिवसेनेनं भाष्य केले होते. महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ एकमताने एक फाईल राज्यपालांकडे पाठवते व राज्यपाल सहा महिने त्यावर निर्णय घेत नाहीत. यास मंदगती म्हणावे की आणखी काय, असा प्रश्‍न संजय राउतांनी सामनाच्या अग्रलेखातून केला होता. 

‘सामना’ चित्रपटातील ‘मारुती कांबळेचं काय झालं?’ या गहन प्रश्नाप्रमाणे १२ सदस्यांच्या नियुक्तीच्या फाईलचे काय झाले? असा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे. फाईलचे वय सहा महिन्यांचे आहे. त्यामुळे काल मुंबई किनारपट्टीवर धडकलेल्या तौते चक्रीवादळाचा तडाखा त्या फाईलला बसला. वादळलाटा राजभवनात शिरल्या व फाईल वाहून गेली, असेही म्हणता येणार नाही,” अशी टीका त्यांनी राज्यपालांवर केली आहे.

महाराष्ट्राच्या संयमाचा बांध फुटेल, असे कोणीही वागू नये. महाराष्ट्र पुरोगामी, संयमी आहे म्हणजे तो भेकड आहे, असेही समजू नये. ज्येष्ठांचा व पाहुण्यांचा आदर करणे ही महाराष्ट्राची परंपरा आहे. पण ‘भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळांच्या माथी हाणू काठी’ हेसुद्धा आमचे संतसज्जन आम्हाला सांगून गेले आहेत. राज्यपालांनी करावीत, अशी अनेक कामे आहेत. फायलींवर बसून राहण्यापेक्षा ही कामे केल्याने त्यांचा नावलौकिक वाढेल, असे शिवसेनेनं म्हटलं आहे. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com