नाना पटोले म्हणाले, कोण प्रवीण कुंटे? मी ओळखत नाही... - nana patole said who is pravin kunte i do not know | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई , 7 किलोग्राम यूरेनियमसह 2 जणांना अटक. दोन्ही आरोपी मागिल अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या शोधात होते. जप्त केलेल्या युरेनियमची किंमत बाजारात २१ कोटी रुपये आहे.
गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील घरासमोर अज्ञाताने शेणी पेटवल्या, त्यामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पेटवलेल्या शेणी विझवून तेथून हटविल्या आहेत .

नाना पटोले म्हणाले, कोण प्रवीण कुंटे? मी ओळखत नाही...

अभिजित घोरमारे
मंगळवार, 30 मार्च 2021

शरद पवार आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट झाल्याच्या चर्चा देशभर सुरू झाल्या होत्या. त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रवक्त्यांनी प्रतिक्रिया द्यायला पाहिजे, तर त्याच्याही आधी शिवसेनेचे नेते संजय राऊत ट्विट करून शरद पवार आणि अमित शहांची भेट झालीच नसल्याचे सांगतात. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रवक्त्यासारखी भूमिका त्यांनी काल मांडली.

भंडारा : नाना भाऊंनी तारतम्य ठेवून बोलावे.. नुसत्या धमक्या देऊ नये, तर सत्तेच्या बाहेर पडून दाखवावे, असे आव्हान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ता प्रवीण कुंटे यांनी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिले होते. त्यावर कोण प्रवीण कुंटे? मी ओळखत नाही, अशी प्रतिक्रिया पटोले यांनी आज येथे दिली. 

पटोले म्हणाले, शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत सातत्याने आमच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडत असतात.महत्वाचे म्हणजे शिवसेना ही काही आता युतीची सदस्य नाही, हे आम्ही त्यांना वारंवार सांगितले. आमच्या नेत्यांवर टिका करणे थांबवा, हेसुद्धा सांगितले. आम्ही सरकार नाही, पण आमच्यामुळे सरकार आहे, हेही सांगितले. तरीही ते त्यांना कळते की नाही, माहिती नाही. तुम्ही शरद पवार साहेबांचे प्रवक्ते आहात का, असा प्रश्‍न आम्ही संजय राऊत यांना केला. 

याचे कारण म्हणजे शरद पवार आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट झाल्याच्या चर्चा देशभर सुरू झाल्या होत्या. त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रवक्त्यांनी प्रतिक्रिया द्यायला पाहिजे, तर त्याच्याही आधी शिवसेनेचे नेते संजय राऊत ट्विट करून शरद पवार आणि अमित शहांची भेट झालीच नसल्याचे सांगतात. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रवक्त्यासारखी भूमिका त्यांनी काल मांडली. त्यामुळे जे आम्ही म्हणालो होतो, ते अगदी स्पष्ट आहे. 

हेही वाचा : अखेर मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी निलंबित...

लॉकडाऊन रात्री करावे...
राज्यातील जनतेची सुरक्षा हा महत्वाचा भाग आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगितले की, लोकांमध्ये शिस्त रहावी, त्यांना परिस्थितीची जाणीव राहावी, यासाठी लॉकडाऊन दिवसा न करता रात्रीच्या वेळी करावे. मास्क घालणे आता अनिवार्य आहे. यासाठी सक्ती करण्याची गरज पडू नये, तर प्रत्येकाने आपली आणि इतरांची सुरक्षा पाहता स्वयंशिस्त पाळून मास्क वापरावा. हाच एक उपाय आता यावर राहिलेला आहे. काल नागपुरात ५० पेक्षा जास्त लोक कोरोनामुळे मृत्युमुखी पडले. प्रत्येक जिल्ह्यात मृतांचा आकडा वाढत चालला आहे. तरुण मोठ्या संख्येने बाधित होत आहेत. त्यामुळे लॉकडाऊन दिवसा न करता रात्री करावा, असे नाना पटोले म्हणाले. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख