अखेर मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी निलंबित... - finally chief forest officer m s reddy suspended | Politics Marathi News - Sarkarnama

अखेर मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी निलंबित...

अरुण जोशी
मंगळवार, 30 मार्च 2021

शासन रेड्डी यांना पाठीशी घालत असून त्यांच्यावर कारवाई करण्यात टाळाटाळ करीत असल्याचाही आरोप करण्यात येत होता. त्यानंतर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा करून जिल्ह्यातील परिस्थिती आणि जनतेच्या भावना त्यांच्यासमोर व्यक्त केल्या.

अमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्या अटकेनंतर त्याला पाठीशी घालणाऱ्या अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस.रेड्डी यांच्यावर देखील सहआरोपी म्हणून कारवाई करण्याची मागणी विविध राजकीय पक्ष आणि संघटनांतर्फे करण्यात येत होती. हे प्रकरण चिघळत असल्याचे पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घातले आणि अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांच्या निलंबनाचे आदेश दिले.

शासन रेड्डी यांना पाठीशी घालत असून त्यांच्यावर कारवाई करण्यात टाळाटाळ करीत असल्याचाही आरोप करण्यात येत होता. त्यानंतर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा करून जिल्ह्यातील परिस्थिती आणि जनतेच्या भावना त्यांच्यासमोर व्यक्त केल्या. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांच्या निलंबनाचे आदेश दिले. मुख्यमंत्री कार्यालयाने विशेष बाब म्हणून रेड्डी यांच्या निलंबनाचे आदेश निर्गमित केले आहेत.

सदर गुन्ह्याचा तपास विशेष महिला पोलीस अधिकारी मोर्शीच्या उपविभागीय अधिकारी पूनम पाटील यांच्याकडे रविवारी सोपविल्यानंतर आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार बाला याला उपविभागीय पोलीस अधिकारी पूनम पाटील, पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी, एपीआय वर्षा खरसान, पीएस महापुरे, पोलीस कर्मचारी अनिल झारेकर, अरविंद सरोदे यांनी कडक पोलीस बंदोबस्तात पुन्हा सोमवारी दुपारी दीड वाजता न्यायालय धारणी येथे हजर केले. तेथे प्रथम न्यायाधीश एम.एस. गाडे यांनी त्याला एक दिवसाची वाढीव पोलीस कोठडी सुनावल्याने आरोपी विनोद शिवकुमार बाला हा ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडीत राहणार आहे. तर तपासा दरम्यान पोलिसांनी शिवकुमार याच्या घरून लॅपटॉप, पेन ड्राइव्ह व शासकीय दस्तऐवज जप्त केले. तेथील कर्मचाऱ्यांचे बयाण पोलिसांनी नोंदविले आहेत. ज्या ठिकाणावरून शिवकुमार दीपालीला सेल्फी फोटो काढून पाठवायला सांगायचा त्या जंगलातील ठिकाणाची पाहाणीसुद्धा पोलिसांनी केली आहे. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख