मुनगंटीवार म्हणाले; नितीनजी म्हणजे, बब्बरशेर, पुलकरी, रोडकरी अन् विकासपुरूष…

आपल्याला जनसेवेसाठी सज्ज राहण्याची आवश्यकता आहे. कोरोना काळात आपले नेते नितीनजींनी सर्वसामान्य जनतेला मदत करण्यासाठी जो पुढाकार घेतला तोच आदर्श समोर ठेवून आपणही सेवाकार्य करू, असे प्रतिपादन विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
Nitin Gadkari - Sudhir Mungantiwar
Nitin Gadkari - Sudhir Mungantiwar

नागपूर : कोरोना संक्रमणाच्या काळात आपले नेते केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी Union Minister Nitin Gadkari यांनी पुढे येऊन नागपूर आणि एकंदरीतच विदर्भासाठी जे कार्य केले, त्या सेवाकार्याचा आदर्श समोर ठेवूनच आपण सर्वांनी कार्य केले पाहिजे, We should all work with that ideal of service in mind असे आवाहन कार्यकर्त्यांना करत, नितीनजी म्हणजे, बब्बरशेर, पुलकरी, रोडकरी अन् विकासपुरूष…, असे म्हणत राज्याचे माजी अर्थमंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार MLA Sudhir Mungantiwar यांनी नितीन गडकरींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.  Happy Birthday to Nitin Gadkari

कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेत परिस्थिती हाताबाहेर जात असताना, ‘ही तक्रार करण्याची वेळ नाही, तर काम करण्याची वेळ आहे, असे म्हणत नितीनजींनी नागपूरसह संपूर्ण विदर्भातली परिस्थिती आपल्या हातात घेतली आणि ऑक्सिजन, रेमडेसिव्हिर इंजेक्शन्स, व्हेंटीलेटर्स ही सर्व व्यवस्था लावण्यासाठी कंबर कसली पाहता पाहत या सर्व गोष्टींचा तुटवडा कमी झाला. अगदी यात पद्धतीने आपण सर्वांनी कार्य केले पाहिजे, कारण संकटसमयी जनतेच्या मदतीसाठी जो धावून जातो, तो भाजपचा कार्यकर्ता असतो, अशी आपली ओळख आहे. ही ओळख जपतच आपल्याला पुढील कार्य करायचे आहे, असे सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले. 

कोरोनाची तिसरी संभाव्य लाट लक्षात घेता तिचा सामना करण्यासाठी आपल्याला सज्ज राहायचे आहे. आपल्याला जनसेवेसाठी सज्ज राहण्याची आवश्यकता आहे. कोरोना काळात आपले नेते नितीनजींनी सर्वसामान्य जनतेला मदत करण्यासाठी जो पुढाकार घेतला तोच आदर्श समोर ठेवून आपणही सेवाकार्य करू, असे प्रतिपादन विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. नितीन गडकरी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने ९ ऑक्सिजन कॉन्सनट्रेटरचे वितरण करण्यात आले.

दुर्गापूरसाठी 3, जिवतीसाठी2 , वरोरा 2, गडचांदूर 2 असे एकूण 9 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर वितरित केले. यावेळी भाजप नेते रामपाल सिंह, हनुमान काकडे, गौतम निमगडे, जिवती पंचायत समितीचे उपसभापती महेश देवकते, दत्ता राठोड, निरूपती कुंडगिर , सुधाकर राठोड , वरोरा येथील भाजप नेते बाबा भागडे, डॉ. भगवान गायकवाड, जगदीश तोटावार, गडचांदूर येथील सतीश उपलेंचवार, भाऊ मोरे, नथ्थु नक्षीने यांची उपस्थिती होती. यापूर्वीही आमदार मुनगंटीवार यांनी चंद्रपूर, बल्लारपूर, मूल, पोम्भूरणा, घुग्गुस, मानोरा, नकोडा, पांढरकवडा, ताडाळी, डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती आदी ठिकाणी  ८८ ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर वितरित केले आहेत. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com