लढा कोरोनाविरुद्ध : रशियात प्राण्यांसाठीही कोरोना लसीकरण मोहीम सुरू

जगभरात मानव जातीच्या कोरोना लसीकरणाचे आव्हान असताना रशियाने आता प्राण्यांसाठी कोरोना लसीकरण सुरू केले आहे.
russia now starts covid 19 vaccination for animals in country
russia now starts covid 19 vaccination for animals in country

नवी दिल्ली :  जगात कोरोना (Covid19) संसर्गाची दुसरी लाट आली असून, सर्व देशांनी लसीकरणावर (Covid vaccination) भर दिला आहे. परंतु, जगभरात लस टंचाई निर्माण झाली आहे. मानव जातीच्या कोरोना लसीकरणाचे आव्हान असताना रशियाने (Russia) मात्र, आता प्राण्यांसाठी कोरोना लसीकरण (Animals vaccinatiion) सुरू केले आहे. 

रशियातील अनेक विभागांत प्राण्यांसाठी कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. प्राण्यांमध्ये कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी ही लस दिली जात आहे. रशियातील फेडरल सर्व्हिस फॉर व्हेटरनरी अँड फायटोसॅनिटरी सुपरव्हिजन या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी ही लस विकसित केली आहे. या लशीचे नाव कार्निव्हॅक-कोव्ह असे आहे. रशियातील  अनेक शहरांमध्ये सरकारने लशीचा पुरवठा केला आहे. 

प्राण्यांसाठीची ही जगातील एकमेव कोरोना लस आहे. रशियाने या लशीचे उत्पादन वाढवले आहे. आता प्राण्यांच्या लसीकरणाची मोहीम सुरू झाली आहे. या लशीच्या चाचण्या कुत्रे, मांजर, कोल्हा आणि मिंक यांच्यात अँटीबॉडीज तयार झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर मार्च महिन्यात या लशीची नोंदणी करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली होती. सुरवातीला 17 डोसचे उत्पादन घेण्यात आले असून, ते वाढवण्यात येत आहे. 

जगभरातून लशीला मागणी 
जर्मनी, ग्रीस, पोलंड, ऑस्ट्रिया, कझाकस्तान, ताजिकीस्तान, मलेशिया, थायलंड, दक्षिण कोरिया, लेबनॉन, इराण आणि अर्जेंटिना या देशांतील कंपन्यांनी या लशीची खरेदी करण्यात रस दाखवला आहे. सुमारे 20 कंपन्या लस खरेदीस तयार आहेत. या कंपन्या त्यांच्या लशीच्या मान्यतेसाठी अर्ज करतील. मान्यता मिळाल्यानंतर रशियाकडून त्यांना पुरवठा केला जाणार आहे.

डब्लूएचओने आधीच दिला होता धोक्याचा इशारा  
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) कोरोनाचा संसर्ग मानव आणि प्राण्यांमध्ये होऊ शकतो, असा धोक्याचा इशारा दिला आहे. अनेक ठिकाणी प्राण्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या लशीमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या प्राण्यांचा बचाव होईल आणि विषाणूचे म्युटेशनही होणार नाही, असा रशियाचा दावा आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com