मनसेची राष्ट्रीय स्तरावरील हिंद मजदूर सभेत एन्ट्री, कक्षा विस्तारणार... 

हिंद मजदूर या संघटनेला राजकीय वरदहस्त नाही. सर्वसामान्यांची ही संघटना देशभर काम करते. महाराष्ट्राचा महासचिव म्हणून आमचे नेते राज ठाकरे यांनी ही जबाबदारी सोपविली आहे.
Raju Umbarkar - Raj Thackeray
Raju Umbarkar - Raj Thackeray

नागपूर : ‘मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा’, म्हणत राज ठाकरे MNS Leader Raj Thackeray यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. महाराष्ट्रापुरती मर्यादित असलेल्या मनसेने आता राष्ट्रीय स्तरावरील हिंद मजदूर सभेत एन्ट्री घेतली आहे. त्यामुळे आता मनसे आपल्या कक्षा रुंदावण्याच्या तयारीत असल्याचे दिसतेय. Scope will expanded.

मनसेचे विदर्भात तसे फारसे प्राबल्य नाही. उपराजधानी असलेल्या नागपुरातही मनसे फारशी कुठे दिसत नाही. पण यवतमाळ जिल्ह्यात, त्यातल्या त्यात वणी येथे मात्र मनसेचा स्थापनेपासून आजही बोलबाला आहे. आता वणीकर असलेले प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्यावर हिंद मजदूर सभेची महाराष्ट्राची जबाबदारी राज ठाकरे यांनी सोपविली आहे. या संघटनेच्या माध्यमातून राज्यभरातील शेतकरी आणि कामगारांवर होणारे अन्याय दूर करण्यासाठी मनसे काम करणार आहे. 

शेतकरी आणि कामगारांना मनसे स्टाईलने न्याय मिळवून देणार...
हिंद मजदूर या संघटनेला राजकीय वरदहस्त नाही. सर्वसामान्यांची ही संघटना देशभर काम करते. महाराष्ट्राचा महासचिव म्हणून आमचे नेते राज ठाकरे यांनी ही जबाबदारी सोपविली आहे. कामगार आणि कास्तकार यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला आता वाचा फोडली जाईल. गेलेल्या जमिनींच्या मोबदल्यात वेकोलिने अद्यापही  त्यांच्या मुलांना नोकऱ्या दिल्या नाही. मुले बेरोजगार आहेत. पण मनसे पहिल्यांदा राष्ट्रीय स्तरावर काम करणार आहे. त्यामुळे मनसे स्टाईलने शेतकरी आणि कामगारांना न्याय मिळवून दिला जाईल. असे मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष आणि हिंदू मजदूर सभेचे महासचिव राजू उंबरकर म्हणाले. 

गेल्या कित्येक वर्षांपासून वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत करीत आली आहे. पण ज्यांच्या जमिनी घेतल्या त्यांना न्याय दिला नाही. याशिवाय वेकोलिने जबाबदारी घेतलेल्या गावांचे पुनर्वसनही पूर्ण करण्यात आले नाही. उत्खननामुळे मातीचे पहाड निर्माण करून ठेवलेले आहे. त्यामुळे अपघात होण्याचा धोका नेहमी असतो. कोळशाची वाहतूक करताना उडणारी धूळ हे सर्व येथील जनता सहन करते. मात्र नोकऱ्या परप्रांतीयांना दिल्या जातात. आमचा युवक कायम बेरोजगार राहिला आहे. पण आता असे होऊ देणार नाही. हिंद मजदूर सभेच्या माध्यमातून प्रत्येकाला न्याय मिळवून दिला जाईल. त्यासाठी मनसे स्टाईलने ‘खळ खट्याक’ करण्याची गरज पडली तर तेसुद्धा करू, असेही उंबरकर म्हणाले. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com