व्हॉटसअॅपद्वारे एका मिनिटात लस घेण्याचा स्लॉट बुक करा..अशी आहे प्रक्रिया

सरकारच्या कोरोना हेल्पडेस्क या ९०१३१५१५१५ व्हॉट्‌सॲप क्रमांकावरून मिळविता येईल.
Vaccination.jpg
Vaccination.jpg

नवी दिल्ली  : केंद्र सरकारने आता कोरोना लस घेण्याची प्रक्रिया अधिक सोपी केली आहे. व्हॉटसअॅपद्वारे कोणत्याही व्यक्तीला एका मिनिटात स्लॉट बुक शक्य झाले आहे. 
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. http://wa.me/९१९०१३१५१५१५ यावर जाऊन स्लॉट बुकिंग करता येणार आहे. लस घेतल्यानंतर त्याचे प्रमाणपत्र देखील केंद्र सरकारच्या कोरोना हेल्पडेस्क या ९०१३१५१५१५ व्हॉट्‌सॲप क्रमांकावरून मिळविता येईल. हा क्रमांक मोबाइलमध्ये सेव्ह केल्यावर व्हॉट्सॲपद्वारे या सुविधा मिळतील.

‘बुक स्लॉट’ असा संदेश इंग्रजीत पाठविल्यावर लसीकरणाचा दिवस निश्‍चित होईल. व्हॉट्सॲप क्रमांकावर कोविड सर्टिफिकेट असे इंग्रजीत टाइप केल्यानंतर नोंदणीकृत मोबाईलचा शहानिशा करण्यासाठी ओटीपी येईल. तो दिल्यानंतर प्रमाणपत्र मिळेल. ही सेवा हिंदीतही उपलब्ध आहे. त्यासाठी सुरवातीला ‘हिंदी’ असा मेसेज पाठवावा लागेल. यापूर्वी कोविन ॲपवरून लसीकरणाचे प्रमाणपत्र डाऊनलोड करावे लागत होते. लसीकरणासाठी दिवस निश्‍चित करायचा असेल, तर ‘बुक स्लॉट’ असा एक संदेश कोरोना हेल्पडेस्कवर पाठवा.

स्लॉट बुक करण्याची अशी आहे प्रक्रिया 

  • लसीकरणासाठी दिवस आणि वेळ निश्‍चित होईल. त्यापूर्वी तुम्हाला एसएमएसद्वारे ओटीपी येईल. 
  • तो व्हॉट्सॅपवर पाठविल्यानंतर तुमची कोविनवरील नोंदणी तपासली जाईल. 
  • तुम्ही पहिला डोस घेतला असेल, तर त्याची पूर्ण माहिती तुम्हाला दिसेल. 
  • डोस घेतला नसल्यास व्हॉट्सॲपवर त्याप्रमाणे संदेश येतील आणि तुमचा लसीकरणाचा दिवस निश्‍चित होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com