वर्षा, मातोश्रीवर २०० कॉल केले, त्यानंतर चिकटवले निवेदन, आता ‘वर्षा’वर चिकटवणार...

सध्याच्या नियोजनाप्रमाणे कोरोना लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी होत असल्याने सोशल डिस्टंसींगचा फज्जा उडाला आहे. यातून कोरोना संक्रमण वाढू शकते. म्हणून ग्रामीण व शहरी भागात पल्स पोलिओच्या नियोजनाच्या धर्तीवर कोरोना लसीकरण घरोघरी जाऊन आशा वर्कर, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून करावे.
Ravi Rana
Ravi Rana

नागपूर : जे मुख्यमंत्री Chief Minister गेल्या १५ महिन्यांपासून मंत्रालयात आले नाही, त्यांच्यासमोर आमच्या समस्या मांडायच्या कशा? त्यांच्या वर्षा बंगल्यावर आणि मातोश्रीवर २०० पेक्षा जास्त कॉल केले. More than 200 calls were made to Varsha Bungalow and Matoshri पण ते फोनवरसुद्धा उपलब्ध होत नाही. अशा वेळी आम्ही लोकप्रतिनिधींनी करावे तरी काय, असा प्रश्‍न उपस्थित करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Chief Minister Uddhav Thackeray यांच्या केबिनच्या दारावर मागण्यांचे निवेदन चिकटवले, असे अमरावती जिल्ह्यातील बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा Badnera's MLA Ravi Rana यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले. अजूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही, तर मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ बंगल्याच्या दारावर निवेदन चिकटवणार असल्याचेही आमदार राणा म्हणाले. MLA Rana also said that he would post a statement on the door of 'Varsha' bungalow

आमदार राणा म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी अद्याप त्यांच्या केबिनचे तोंडही पाहिले नाही आणि हे राज्याचा कारभार चालवत आहेत. त्यामुळे आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींवर अशी वेळ आली आहे. मी वारंवार मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी वेळ मागितली, ती त्यांनी दिली नाही. जनतेचे अनेक प्रश्‍न आहेत, ते ऐकायला तयार नाहीत. फोनवर बोलायला तयार नाहीत. मग आम्ही लोकांचे प्रश्‍न सांगायचे कुणाला? आम्ही आमच्या घरची कामे घेऊन त्यांच्याकडे जात नाही, तर ज्या लोकांना आम्हाला निवडून दिले, त्यांची कामे घेऊन जातो. यामध्ये बेरोजगारी, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लोकांचे प्रचंड हाल झाले. त्यांना बेड्स, इंजेक्शन्स, ऑक्सिजन, ॲम्बुलन्स मिळत नव्हते. अमरावती जिल्ह्यात तर परिस्थिती भीषण झाली होती. आता कोरोनाची तिसरी लाट येऊ घातली आहे आणि त्यासाठीचे काहीच नियोजन नाही. या प्रश्‍नांच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांची भेट मागितली होती. पण त्यांनी ती नाकारल्यामुळे आज त्यांच्या केबिनच्या दारावर मागण्यांचे निवेदन चिकटवण्याची वेळ आली. 

मुख्यमंत्री चंद्रपूरची दारूबंदी हटवू शकतात...
मुख्यमंत्री चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी हटवू शकतात, पण लोकांच्या जीवनमरणाच्या प्रश्‍नांसाठी वेळ देऊ शकत नाही. कोरोनाची तिसरी लाट येऊ घातली आहे, ती येण्यापूर्वी प्रत्येक जिल्‍ह्यात १००० बेड्सचे कोविड हॉस्पिटल्स उभारण्याची गरज आहे. अशाच जनहिताच्या मागण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायची होती. पण त्यांना जनतेच्या प्रश्‍नांमध्ये इंटरेस्ट नाही, असेच त्यांच्या वागणुकीवरून दिसून आले असल्याचे आमदार रवी राणा म्हणाले. 

काय आहे आमदार राणांचे निवेदन...
अमरावती जिल्ह्यामध्ये कडक लॉकडाऊन लावले असल्याने गोरगरीब व सामान्य नागरिक संकटात सापडले आहेत. राज्य सरकारने त्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून आपण पुढील मागण्या पूर्ण कराव्या. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांनी शासकीय व खासगी रुग्णालयांत जे शासनाच्या पॅनलवर आहेत, त्या रुग्णालयांत विनामूल्य उपचाराची घोषणा केली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही व्यवस्था करण्यात यावी. वैद्यकीय तज्ज्ञांच्या माहितीनुसार, तिसऱ्या लाटेचा परिणाम लहान मुलांवर जास्त होणार आहे. असे होऊ नये, पण सावधानी म्हणून सरकारने प्रत्येक जिल्ह्यात १००० बेड्सचे स्वतंत्र बाल जम्बो रुग्णालय उभारावे. 

सध्याच्या नियोजनाप्रमाणे कोरोना लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी होत असल्याने सोशल डिस्टंसींगचा फज्जा उडाला आहे. यातून कोरोना संक्रमण वाढू शकते. म्हणून ग्रामीण व शहरी भागात पल्स पोलिओच्या नियोजनाच्या धर्तीवर कोरोना लसीकरण घरोघरी जाऊन आशा वर्कर, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून करावे. लोकांना घरपोच लस मिळाल्यास सोशल डिस्टंसींगचाही प्रश्‍न राहणार नाही आणि कोरोनाला हद्दपार करण्यासाठी मोठे कार्य होईल, या मागण्या आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांच्या केबिनच्या दारावर चिकटवलेल्या निवेदनातून केल्या आहेत. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com