मोदी सरकारची सातवी वर्षपूर्ती : शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणार भाजपचा कार्यकर्ता... 

मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल नुकतीच पक्षाची राज्यस्तरीय बैठक आभासी पद्धतीने झाली. त्या बैठकीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्यानुसार यंदा मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त विशेष सेवाकार्य करण्यात येईल.
Narendra Modi - BJP
Narendra Modi - BJP

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टी BJP आघाडीच्या केंद्र सरकारला ३० मे रोजी सात वर्षे पूर्ण होत आहेत. या दिवशी भाजप नागपूर महानगरातर्फे कोरोनासंबधी सेवाकार्य करणार आहे, BJP will do corona service on behalf of Nagpur metropolis अशी माहिती शहरअध्यक्ष आमदार प्रवीण दटके MLA Pravi Datke यांनी दिली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेली स्थिती ध्यानात घेता कोणताही उत्सव होणार नाही. There will be no celebration ३० मे रोजी भाजपचा कार्यकर्ता समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणार असल्याचेही दटके म्हणाले. 

आशा सेविका आणि कोरोनाच्या साथीचा सामना करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा पक्षातर्फे सत्कार करण्यात येणार आहे. स्थानिक आमदार, नगरसेवक, मंडळ अध्यक्ष, सर्व पदाधिकारी भाजपचे कार्यकर्ते कोरोनासंबंधी सेवाकार्य करतील. खासदार डॉ. विकास महात्मे, प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे, गिरीष व्यास, विकास कुंभारे, मोहन मते, महापौर दयाशंकर तिवारी, माजी आमदार सुधाकर देशमुख,  प्रा. अनिल सोले, सुधाकर कोहळे, डॉ मिलिंद माने, मंडळ अध्यक्ष किशोर वानखेडे, देवेन दस्तूरे, किशोर पलांदुरकर, संजय अवचट, संजय चौधरी सेवाकार्यात सहभागी होतील. 

पक्षातर्फे कोरोनाच्या संकटात सातत्याने सेवाकार्य सुरू आहे. पक्षातर्फे ३० मेचा दिवसही विशेष सेवाकार्य करून साजरा करण्यात येणार आहे. कोरोनासंबंधी सर्व नियमांचे पालन करून आणि प्रशासनाला सहकार्य करून हा उपक्रम होईल. दटके यांनी सांगितले की, भाजपच्या युवा मोर्चा, महिला मोर्चा, किसान मोर्चा अशा सर्व मोर्चांचे कार्यकर्ते या दिवशी रक्तदान शिबिरांचे आयोजन करणार आहेत. तसेच शहरांमध्ये, वस्त्यांमध्ये विशेष सेवाकार्य करणार आहेत.

दटके म्हणाले की, मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल नुकतीच पक्षाची राज्यस्तरीय बैठक आभासी पद्धतीने झाली. त्या बैठकीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्यानुसार यंदा मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त विशेष सेवाकार्य करण्यात येईल. या सेवा कार्यावर महामंत्री संजय बंगाले, राम अम्बुलकर, नरेंद्र ऊर्फ बाल्या बोरकर, संगठन मंत्री सुनील मित्रा लक्ष ठेवणार आहेत. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com