रविकांत तुपकरांच्या संकल्पनेतील उपक्रमाला थेट अमेरिकेतून मिळाली मदत...

आनंद जाधव अमेरिकेत असले तरी त्यांचे चित्त आपल्या जिल्ह्यात आहे. आपल्या जिल्ह्यातील रुग्णांसाठी आपणही काहीतरी मदत करावी, आपलेही सामाजिक उत्तरदायित्व आहे या भावनेतून त्यांनी दोन ऑक्सिजन कॉन्सट्रेटर उपलब्ध करून दिल्याचे तुपकर यांनी सांगितले.
Sarkarnama Banner
Sarkarnama Banner

बुलडाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर Ravikant Tupkar यांच्या संकल्पनेतून किन्होळा Kinhola येथे जिल्ह्यातील पहिले लोकसहभागातून निर्माण झालेले कोरोना आयसोलेशन सेंटर सुरू झाले. The first public participation corona isolation center was started हळूहळू या आयसोलेशन सेंटरचे रूपांतर कोरोना हॉस्पिटलमध्ये होत आहे. The conversion is taking place at Corona Hospital तुपकरांच्या संकल्पनेतील या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत असून आता थेट अमेरिकेतूनही मदतीचा हात समोर आला आहे. Got Help from USA रविकांत तुपकर यांच्या संकल्पनेतील कोविड सेंटरच्या उपक्रमाला दोन ऑक्सिजन कॉन्सट्रेटर Oxygen concentrator भेट मिळाले आहेत. 

सध्या कोरोनाची लाट ओसरत असून संसर्ग आटोक्यात येत असल्याचे चित्र असले तरी महिनाभरापूर्वी जिल्ह्याची परिस्थिती अत्यंत भीषण आणि विध्वंसक झाली होती. त्यावेळी रविकांत तुपकर यांनी ग्रामीण भागात गावागावांमध्ये आयसोलेशन सेंटर निर्माण व्हावे, अशी संकल्पना मांडली आणि त्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या संकल्पनेतून आणि किन्होळा ग्रामस्थांच्या पुढाकाराने किन्होळ्यात लोकसहभागातून जिल्ह्यातील पहिले आयसोलेशन सेंटर सुरू झाले. किन्होळा पॅटर्नची चर्चा संपूर्ण राज्यात झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील हा पॅटर्न जिल्हाभर राबविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या तर राज्याच्या सचिवांनी देखील किन्होळा पॅटर्नचे कौतुक केले. 

दरम्यान या सेंटरमध्ये रुग्णांसाठी विविध सुविधा उपलब्ध व्हाव्या, म्हणून समाजातील नागरिकांनी, दानशुरांनी हातभार लावण्यास सुरुवात केली. रविकांत तुपकर यांच्या या उपक्रमाची माहिती अमेरिकेत नोकरीनिमित्त वास्तव्यास असलेले त्यांचे मित्र तथा बुलडाणा येथील एकता नगरमधील रहिवासी आनंद बाबूराव जाधव यांना मिळाली. त्यांनी तुपकरांशी संपर्क साधून आपल्या जिल्ह्याच्या गावातील रुग्णांसाठी काहीतरी करण्याची तयारी दाखवीत आयसोलेशन सेंटरच्या या उपक्रमाला हातभार लावण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी एक नव्हे तर दोन ऑक्सिजन कॉन्सट्रेटर भेट देण्याचा मानस व्यक्त केला. लगेच या दोन मशीनची ऑर्डर देण्यात आली परंतु मशीन उपलब्ध होण्यास थोडा विलंब झाला. दरम्यान काल २७ मे रोजी हे कॉन्सट्रेटर बुलडाण्यात पोहोचले आणि आज किन्होळा आयसोलेशन सेंटर येथे आणण्यात आले. 

किन्होळा गावातील रुग्णांना येथे आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आता ऑक्सिजनचीदेखील सुविधा उपलब्ध झाल्याने आयसोलेशन सेंटर नव्हे तर कोविड हॉस्पिटल निर्माण झाले आहे. त्यामुळे येथे आता किन्होळ्यासह पंचक्रोशीतील रुग्णांना भरती करून घेतले जाईल, अशी माहिती रविकांत तुपकर यांनी दिली. ‘घार उडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी’ या म्हणीप्रमाणे आनंद जाधव अमेरिकेत असले तरी त्यांचे चित्त आपल्या जिल्ह्यात आहे. आपल्या जिल्ह्यातील रुग्णांसाठी आपणही काहीतरी मदत करावी, आपलेही सामाजिक उत्तरदायित्व आहे या भावनेतून त्यांनी दोन ऑक्सिजन कॉन्सट्रेटर उपलब्ध करून दिल्याचे तुपकर यांनी सांगितले. 

यावेळी आनंद जाधव यांचे बंधू सचिन बाबूराव जाधव, प्रभु बाहेकर, प्रा. जगदेवराव बाहेकर, पोलीस पाटील नंदकिशोर बाहेकर, राजू बाहेकर आदी उपस्थित होते. तसेच या आयसोलेशन सेंटरसाठी प्रा. जगदेवराव बाहेकर यांनी अकरा हजार रुपयांची मदत यावेळी दिली. डॉ. अनिल साळोख, डॉ. योगेश परिहार यांच्यासह स्वयंसेवकांची उपस्थिती होती. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com