Uddhav Thackeray - Togdiya - Rane
Uddhav Thackeray - Togdiya - Rane

राजकारणी कधी भांडतील अन् कधी गळ्यात गळे घालतील, सांगता येत नाही...

औरंगजेब आणि आमचे पूर्वज एक नाही. आमचे पूर्वज तर छत्रपती शिवाजी महाराज आहेत, असा टोला त्यांनी नाव घेता सरसंघचालक मोहन भागवत यांना हाणला.

नागपूर : राम मंदिराची Ram Temple निर्मिती धूमधडाक्यात होत आहे. अशोक सिंघल, बाळासाहेब ठाकरे व कल्याण सिंग Ashok Singhal, Balasaheb Thackeray and Kalyan Singh हे राम मंदिराचे खरे हीरो आहेत. त्यांच्यामुळेच मंदिर होत आहे, असा टोला आंतरराष्ट्रीय विश्व हिंदु परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया Pravin Togdiya यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना Prime Minister Narendra Modi लगावला. राजकारणात वाद चालतातच, राजकारणात भांडणे व वादविवाद चालतच राहतात. त्याची फारशी चिंता करण्याची गरज नाही. ते कधी भांडतील तर कधी गळ्यात गळे घालतील. ते एकत्र जेवणही घेतील सांगता येत नाही, असे तोगडीया नारायण राणे व उद्धव ठाकरे वादावर आज येथे म्हणाले.

वर्ल्ड ट्रेड सेंटर उद्धस्त केल्यानंतर अमेरिकेने अफगाणीस्तानातून तालीबान्यांना हुसकावून लावीत तिथे लोकनियुक्त सरकार स्थापन केले. आता वीस वर्षांनंतर तालीबान्यांनी अफगाणीस्तानवर ताबा मिळवला आहे. यामुळे सर्वाधिक धोका भारताला आहे. हे लक्षात घेता अफगाणी मुस्लिमांना भारताने कदापि आश्रय देता कामा नये, अशी स्पष्ट भूमिका प्रवीण तोगडिया यांनी येथे माध्यमांशी बोलताना मांडली.

तालीबानी विचारांचे केंद्र भारतात आहे. युपीमधील दारून उल देवबंद आहे. तबलिगी जमात हे त्यांचे मुख्यालय दिल्लीत आहे. तर जमाते उलेमाए ए हिंद या तीन संघटना ६७ देशांत तालीबानी विचारांचा प्रसार करतात. हे लक्षात घेता भारताला सर्वाधिक धोका असून याचा एकजूटीने मुकाबला केला पाहिजे, असे तोगडीया म्हणाले. या तिन्ही संघटनांवर बंदी आणली पाहिजे. कारण देशभरात यांचे मदरसे व मशिदीमधून तालीबानी विचारांचा प्रसार प्रचार होतो, असेही त्यांनी सांगितले. 

ही बातमी पण वाचा ः विदर्भवाद्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला ‘चले जाव’चा नारा...
 
नागपुरच्या प्रत्येक गल्लीत यांचे मदरसे व मशिदी आहेत. एकाही अफगाणी मुस्लिमाला भारताने कदापि आश्रय देता कामा नये. फ्रांसने नायजेरीयासह इतर देशातील मुस्लिमांना आश्रय दिला. तिथे या शरणार्थी मुस्लिमांची तिसरी पिढी फ्रांसच्या पोलिसांची कत्तल करीत आहे. भारतात असे होऊ द्यायचे नसेल तर कोणत्याही परिस्थितीत भारताने अफगाणी मुसलमानांना आश्रय देऊ नये. अनेक मुस्लिम देशांनी अफगाणी मुस्लिमांना आश्रय नाकारला असून तुर्कस्तानने त्यांच्या सीमा सील केल्या आहे. तबलिगी जमात तालीबानी मदरशांची पैदाइश आहे.

आमचे पूर्वज शिवाजी महाराज..
औरंगजेब आणि आमचे पूर्वज एक नाही. आमचे पूर्वज तर छत्रपती शिवाजी महाराज आहेत, असा टोला त्यांनी नाव घेता सरसंघचालक मोहन भागवत यांना हाणला. काही दिवसांपूर्वी भागवत यांनी मुस्लिम आणि हिंदुंचा डीएनए एकच असल्याचे वक्तव्य केले होते. आता आम्ही कोणत्याही पक्षाचे गुलाम नाही. आम्ही देशहिताचे काम करतो. त्यामुळे देशहिताचे काम करणाऱ्या सर्वांसोबत आम्ही आहोत, असे तोगडिया म्हणाले.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com