१२ आमदारांचे निलंबन मागे न घेतल्यास महाराष्ट्रभर आंदोलन पेटवू - if the suspension of 12 mlas is not withdrawn agitation will be all over maharashtra | Politics Marathi News - Sarkarnama

१२ आमदारांचे निलंबन मागे न घेतल्यास महाराष्ट्रभर आंदोलन पेटवू

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 6 जुलै 2021

भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आल्यानंतर भाजप चांगलाच आक्रमक झाला आहे. त्याचाच परिणाम म्हणून माजी ऊर्जामंत्री चंद्रेशखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. 

नागपूर : पावसाळी अधिवेशनाच्या काल पहिल्या दिवशी भारतीय जनता पक्षाच्या BJP १२ आमदारांनी 12 MLA's वेलमध्ये येऊन गोंधळ घातल्याचा ठपका ठेवत त्यांना १ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. Suspension for one year या कारवाईच्या विरोधात भाजपतर्फे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे Chandrashekhar Bawankule यांच्या नेतृत्वात येथील बडकस चौकात Badkas Square आंदोलन करण्यात आले. 

आमच्या १२ आमदारांचे निलंबन तात्काळ मागे न घेतल्यास महाराष्ट्रभर याहीपेक्षा तीव्र आंदोलन करू, असा इशारा यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. तर महाराष्ट्र विधानसभेच्या इतिहासात असा गोंधळ आजवर कुणीही घातला नसल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला आहे. काल विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ झाला. भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आल्यानंतर भाजप चांगलाच आक्रमक झाला आहे. त्याचाच परिणाम म्हणून माजी ऊर्जामंत्री चंद्रेशखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. 

याठिकाणी कार्यकर्त्यांनी गर्दी केली असून राज्य सरकारविरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली गेली. ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आणण्याचा कट राज्य सरकारने रचलेला आहे. त्यामुळे कट रचून १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे, असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. तसेच आंदोलनामध्ये हळूहळू गर्दी वाढत असल्यामुळे पोलिसांचा बंदोबस्तदेखील वाढवण्यात आला आहे. तसेच हा वर्दळीचा परिसर आहे आणि कार्यकर्त्यांनी चौकात आंदोलन केल्यामुळे वाहतूक देखील खोळंबली आहे. यावेळी राज्य सरकारचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला. तसेच राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

हेही वाचा : शिवसैनिक जगला काय अन्‌ मेला काय?; कोणाला काही देणे-घेणे नाही

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आतापर्यंत ओबीसी आरक्षणाबाबत एकही शब्द बोलले नाहीत. पुढच्या निवडणुकीमध्ये ओबीसींना डावलून धनदांडग्यांना सत्तेत आणण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे झारीतील शुक्राचार्य आहेत. त्यांना ओबीसींना आरक्षण द्यायचं नाही, असा गंभीर आरोप माजी ऊर्जामंत्री आणि ओबीसी नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. आज त्यांच्या नेतृत्वात नागपुरातील बडकस चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख