भाजपचे धोरण आरक्षणमुक्त भारत असेल, तर भाजपमुक्त भारत करू...

कोविड व्हॅक्सिनच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदी यांचा फोटो निर्ल्लजपणे छापण्यात येतो. हाच फोटो ते कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्या लाखो नागरिकांच्या कफनावर का नाही लावत.
OBC Reservation
OBC Reservation

अकोला : आरक्षणमुक्त भारत हे जर भाजपचे धोरण असेल तर भाजपमुक्त भारत हे काँग्रेस ओबीसी विभागाचे धोरण राहील, If BJP's policy is reservation free india then congress's obc cell's policy will be bjp free india असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी Bhanudas Mali यांनी दिला. १५ नोव्हेंबरपर्यंत इम्पिरिकल डेटा उपलब्ध करून न दिल्यास दिल्लीच्या जंतरमंतर वर १० लाख ओबीसी बांधव आंदोलन करतील, असा इशाराही त्यांनी दिला. 

पश्चिम विदर्भ दौऱ्यावर असताना आज विश्राम भवन येथील पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. भानुदास माळी यांनी सांगितले की, येत्या ९ ऑगस्टला क्रांती दिनी राज्यातील काँग्रेस ओबीसी विभागामार्फत सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ओबीसीचा इम्पेरिकल डाटा केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला १५ नोव्हेंबरपर्यंत उपलब्ध करून न दिल्यास दिल्ली येथील जंतर मंतरवर देशातील काँग्रेस ओबीसी विभागातून दहा लाख ओबीसी बांधव आंदोलन करतील आणि यांचे नेतृत्व राहुल गांधी, प्रियंका गांधी व प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले करतील. आज संपूर्ण देश अदानी, अंबानी यांसारख्या भांडवलदाराकडे विकण्याची तयारी मोदी सरकार करीत आहे. 

कोविड व्हॅक्सिनच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदी यांचा फोटो निर्ल्लजपणे छापण्यात येतो. हाच फोटो ते कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्या लाखो नागरिकांच्या कफनावर का नाही लावत, असा सवाल माळी यांनी केला. ओबीसीची जातनिहाय जनगणना करून राजकीय आरक्षण परत मिळेपर्यंत विविध आंदोलने आगामी विधानसभा निवडणुकांपर्यंत ओबीसी विभाग सुरू ठेवेल, असे माळी यांनी स्पष्ट केले. पत्र परिषदेला राजेंद्र हाडोळे, ओबीसी ग्रामीण जिल्हाध्यक्ष सत्यनारायण घाटोळे, प्रभाकर वानखडे, भगवान कोळी, संतोष रसाळकर, मंगला भुजबळ, महादेव हुरपडे, अनंत बगाडे, जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर चिंचोळकर, जिल्हा महासचिव गोपाल चोरे, विशाल इंगळे, राज कुमार शिरसाठ, राजू वानखडे उपस्थित होते. 

हेही वाचा : परमबीर सिंग परदेशात पळून जातील; लक्ष ठेवा....
 
सुधाकर गणगणे यांची घेतली भेट 
काँग्रेस पक्षातील ओबीसीचे ज्येष्ठ नेते, माजी राज्यमंत्री सुधाकर गणगणे यांची अकोला येथील निवासस्थानी पश्चिम विदर्भ दौऱ्यावर असताना महाराष्ट्र काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी भेट घेऊन ओबीसी संघटन जिल्ह्यात वाढविण्यासाठी चर्चा करण्यात आली. याप्रसंगी, त्यांचे समवेत ओबीसीचे राजाभाऊ हाडोळे, संतोष रसाळकर, भगवान कोळी, मंगला भुजबळ, अनंत बगाडे, महादेवराव हुरपडे, संपर्क प्रमुख ॲड. प्रभाकर वानखडे, ओबीसी विभागाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सत्यनारायण घाटोळे आदी मान्यवर उपस्थित होते. काँग्रेस ओबीसी विभागाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांचे स्वागत करण्यात आले.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com