परमबीर सिंग परदेशात पळून जातील; लक्ष ठेवा....

अधिकारी अडकले आहेत, त्यांना वाचवून मंत्र्यांविरोधात वापरण्याचे हे भाजपाचे षडयंत्र आहे.
परमबीर सिंग परदेशात पळून जातील; लक्ष ठेवा....
Param bir Singh will flee abroad; Keep an eye out says NCP Minister Hasan Mushrif

मुंबई : मनसुख हिरेन प्रकरणात अधिकारी अडकलेले आहेत. त्यांना वाचवून मंत्र्यांविरोधात वापरण्याचे हे भाजपचे षडयंत्र आहे. परमबीर सिंग परदेशात पळून जाऊ नयेत, हे आता केंद्रीय तपास यंत्रणांनी लक्षात ठेवावे, असा सल्ला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. दरम्यान, केंद्राचे सहकार खातं अमित शहा यांच्याकडे असल्याने त्यांच्याकडे अनेक विषय येतात. एफआरपीची १६ त़ १७ हजार कोटी रुपये थकबाकी आहे. त्यामुळे साखरेची किंमत वाढवावी, अशी मागणी घेऊन श्री. पवार गेले होते. यात कुठलंही राजकारण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. Param bir Singh will flee abroad; Keep an eye out says NCP Minister Hasan Mushrif

परमबीर सिंग यांच्या प्रश्नावर मंत्री हसन मुश्रीफ यांना विचारले असता ते म्हणाले, केंद्र सरकारशी हातमिळवणी करून परमबीर सिंग यांनी आरोप केले. ते कोणाच्या इशारा यावरून, असा प्रश्न उपस्थित करून ते म्हणाले, काल मनसुख हिरेन हत्येसाठी पैसे दिल्याचं एनआयएने कोर्टात सांगितलं. सरकार अस्थिर करण्यासाठी मंत्र्यांची चौकशी, अधिकार्‍यांकडे दुर्लक्ष करतायंत.

परमबीर सिंग यांच्यावर अनेकांनी खंडणीचे आरोप केले आहेत, त्याबाबत गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये भाजपने चाळ खेळली आहे. अधिकारी अडकले आहेत, त्यांना वाचवून मंत्र्यांविरोधात वापरण्याचे हे भाजपाचे
 षडयंत्र आहे. परमबीर सिंग परदेशात पळून जाऊ नयेत हे केंद्रीय तपास यंत्रणांनी लक्ष ठेवावे, असा सल्लाही मंत्री मुश्रीफ यांनी दिला आहे. 

राज्यपालाच्या मराठवाडा दौरा वादग्रस्त ठरला आहे, याविषयी विचारले असता मंत्री मुश्रीफ म्हणाले, राज्यपालांचा दौरा आधी ठरला होता. तो बदलला तर अपमान होईल म्हणून त्यांनी कार्यक्रमात बदल केला नसेल. पालकमंत्र्यांचे पूर्वनियोजित कार्यक्रम असतील त्यामुळे ते दौर्‍यावर गेले नसतील. अमित शहांना शरद पवारांना दिलेल्या निमंत्रणावर, मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, केंद्र सरकारने यावेळी सहकार खातं वेगळं केलं आहे. मुळात एफआरपी वाढल्याने साखरेच्या भावात वाढ करावी यासाठी पवारांनी अमित शहा यांची भेट घेतली होती.

त्यांच्याबरोबर साखर संघाचे अध्यक्ष आणि सुनिल तटकरे होते. याभेटीत श्री. पवार यांनी शहा यांना वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिटय़ूटला भेट देण्याची विनंती केली आहे. राज्यातील साखर उद्योगाची माहिती घेण्यासाठी हे
निमंत्रण आहे. यात कुठलंही राजकारण नाही, असे स्पष्ट केले. मंत्री मुश्रीफ म्हणाले, केंद्राचे सहकार खातं अमित शहा यांच्याकडे असल्याने त्यांच्याकडे अनेक विषय आहेत. एफआरपीची १६ त़ १७ हजार कोटी रुपये थकबाकी आहे. त्यामुळे साखरेची किंमत वाढवावी, अशी मागणी घेऊन ते गेले होते. यात कुठलंही राजकारण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

कर्नाटक सरकारने कोरोना टेस्ट सक्तीची केली आहे, याविषयी विचारले असता मंत्री मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूरमध्ये रुग्ण संख्या कमी झाली आहे.
महाराष्ट्रात ही कमी आहे. कर्नाटक ने RT PCR टेस्ट ही अट लावणे योग्य नाही,  हे तात्काळ मागे घेतला पाहिजे. नाही तर तिथे कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती निर्माण होईल.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in