चक्रीवादळावरचे ‘ते’ ट्विट आणि आमदार मिटकरी आले नेटकऱ्यांच्या निशाण्यावर… - hurricane that tweet and mla mitkari hit by netizens | Politics Marathi News - Sarkarnama

चक्रीवादळावरचे ‘ते’ ट्विट आणि आमदार मिटकरी आले नेटकऱ्यांच्या निशाण्यावर…

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 18 मे 2021

आणखी एक माणूस महाराष्ट्राला मिळाला आहे. संजय राऊत साहेब यांच्यानंतर आणखी एक पाऊल पुढं जाऊन हे वादळ थांबवलं, त्याबद्दल धन्यवाद मिटकरी. असेच राहा, याच्यात अजिबात बदल करू नका.

नागपूर : सध्या तौक्तेे चक्रीवादळाने सर्वच हादरले आहेत. त्यामुळे यंत्रणा अलर्टवर आहे. The system is on alert अशा स्थितीत ‘तौक्तेे वादळ हे राष्ट्रीय वादळ आहे, त्याने महाराष्ट्राचा नाद करू नये.’, असे ट्विट आमदार अमोल मिटकरींनी MLA Amol Mitkari केले आहे. त्यावरुन नेटकऱ्यांनी मिटकरींना निशाण्यावर घेतले आहे. Netizens have targeted Mitkari भाजप नेते निलेश राणे BJP Leader Nilesh Rane यांनीही मिटकरींची खिल्ली उडवली आहे. 

ट्विटमध्ये आमदार मिटकरी म्हणाले, ‘तौक्ते वादळ राष्ट्रीय वादळ आहे. त्याने महाराष्ट्राचा नाद करू नये. राष्ट्रीय स्तरावरील वादळ असल्यामुळे याची चिंता दिल्लीश्‍वरांनी करावी. छत्रपती शिवरायाचे राज्य असे अनेक वादळ परतवून लावतो. ती हिम्मत दिल्लीश्‍वर व इथल्या १०६ शिपायांमध्ये नाही.’, हे त्यांचे ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे. कोकण किनारपट्टीसह मुंबई, ठाणे, पालघरला या वादळाचा चांगलाच तडाखा बसला आहे. हजारो घरांचे नुकसान झाले आहे आणि अशा गंभीर परिस्थितीत मिटकरींच्या ट्विटमुळे नेटकरी चांगलेच संतापले आहेत. 

‘या माणसाचा कचरा करायला शब्दच नाहीत. हवामान खात्यातील कर्मचारी हे वाचून ढसाढसा रडून मरतील. ते म्हणतील उगाच खर्च करून अभ्यास केला, डिग्री मिळवली. आकाशाला खुन्नस देत मिटकरी उभा आहे ना थर्माकोलची तलवार घेऊन.’, अशी बोचरी प्रतिक्रिया निलेश राणेंनी दिली. ‘काय बोलता हो तुम्ही, हवामान खातं कोमात जाईल ना... निसर्ग सर्वांना सारखा असतो.. लोकप्रतिनिधी आहे हो तुम्ही पहिलीतलं पोरगंही वेड्यात काढेल हो...’  ‘हे असले बिनडोक लोकप्रतिनिधी असण्यारखं दुसरं दुर्दैव ते काय?’ ‘तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे, ते तुम्हाला तरी माहिती आहे का? राष्ट्रीय वादळ काय? आधी स्थानिक पातळीवरचे प्रश्‍न समजून घ्या आणि मग राष्ट्रीय प्रश्‍न बघा.. आणि हे वादळ काय केंद्राने पाठवलेले आहे का? कुठे, कधी काय बोलावं याचं जरा भान ठेवा. अशांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसने जरा पुनर्विचार करावा.’

‘आणखी एक माणूस महाराष्ट्राला मिळाला आहे. संजय राऊत साहेब यांच्यानंतर आणखी एक पाऊल पुढं जाऊन हे वादळ थांबवलं, त्याबद्दल धन्यवाद मिटकरी. असेच राहा, याच्यात अजिबात बदल करू नका. आमदार पद जाणार नाही, याकडे लक्ष राहू द्या.’,   ‘मिटकरी, राऊत, नवाब मलिक, सचिन सावंत, अरविंद सावंत यांनी किनाऱ्यावर उभे राहून तौक्तेे वादळाला भिती दाखवली. त्यामुळे तौक्ते वादळानं नमतं घेतलं, त्याबद्दल यांच अभिनंदन. इथून पुढे राष्ट्रीय आपत्ती आलीच तर या सर्व महाशयांना बोलवण्यात यावं. कोविड यांचा जिवलग असल्याने त्यांने महाराष्ट्रात घरोबा केला.’, अशा एक ना अनेक खोचक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. 

हेही वाचा : अजित पवार, जयंत पाटील, आता तुम्ही हसताय; पण...

आजच आमदार मिटकरींच्या आमदारकीला एक वर्ष पूर्ण झाले. त्याबद्दल त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आभार माननारे ट्विट केले. त्या ट्विटचे कौतुक होते न होते, तोच या ट्विटने एक नवीन वादळ निर्माण केले आहे. आता मिटकरी नेटकऱ्यांना प्रत्युत्तर देतात की चुप्पी साधण्यात धन्यता मानतात, याकडे नेटकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख