अजित पवार, जयंत पाटील, आता तुम्ही हसताय; पण...

बॅंकेच्या कर्जाचे हप्ते भरणे होत नाहीये. इकडून तिकडून पैसै आणून भरावे लागत आहे. अशा परिस्थितीत कारखान्याची डिस्टीलरी बंद ठेवून जर ऑक्सिजनची निर्मिती केली जात असेल, तर ते हिताचे होणार नाही.
Ajit Pawar - Jayant Patil - Nitin Gadkari
Ajit Pawar - Jayant Patil - Nitin Gadkari

नागपूर : धाराशीव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील President of Dharashiv Sahakari Sugar Factory Abhijit Patil यांनी संकटाच्या वेळी इथेनॉलपासून ऑक्सिजन निर्मितीचा प्रयोग केला आणि तो यशस्वीही केला. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. पण सद्यःस्थितीत सर्व साखर कारखाने अत्यंत वाईट परिस्थितीतून प्रवास करीत आहेत. डिस्टीलरी बंद ठेवणे कसेच परवडणारे नाही. It is unaffordable to close a distillery हा ऑक्सिजन बायप्रॉडक्ट असेल, तर ठीक आहे, अन्यथा एकाचे प्राण वाचव ण्यासाठी दुसऱ्याचे प्राण घेण्यातला हा प्रकार होईल. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar आणि जयंत पाटील Jayant Patil यांनी स्मितहास्य केले. त्यावर अजित पवार, जयंत पाटील, आता तुम्ही हसताय, पण भविष्यात हे होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari म्हणाले. 

धाराशीव सहकारी साखर कारखान्यामध्ये ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात आला. नुकतेच त्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे नितीन गडकरी बोलत होते. आभासी पद्धतीने झालेल्या या उद्घाटन कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील, शंकरराव गडाख आदी उपस्थित होते. यावेळी गडकरी म्हणाले, साखर कारखान्यांची स्थिती सध्या फारच वाईट आहे. बॅंकेच्या कर्जाचे हप्ते भरणे होत नाहीये. इकडून तिकडून पैसै आणून भरावे लागत आहे. अशा परिस्थितीत कारखान्याची डिस्टीलरी बंद ठेवून जर ऑक्सिजनची निर्मिती केली जात असेल, तर ते हिताचे होणार नाही. साखर कारखान्यातून निर्माण होणारा ऑक्सिजन हा बायप्रॉडक्ट असला पाहिजे, तेव्हाच तो परवडेल. 

आमच्या विदर्भापूरता एक प्रयत्न आम्ही केला आहे. ३० कोटी रुपये खर्च करून १२ ऑक्सिजन प्लांट निर्माण करणार आहोत. त्यांतील एका प्लांटचे उद्घाटन येवढ्या होईलही. यासाठी वेकोलिने १५ कोटी रुपये त्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून दिले आहेत. यामधून चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ३.५ कोटी रुपये दिले. त्यामधून मेडिकल कॉलेजकरिता प्लांट उभारण्यात येणार आहे. उर्वरित ११.५ कोटी नागपूर जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यामधून मेडिकल, मेयो आणि एम्स रुग्णालयात हवेतून ऑक्सिजन निर्माण करण्याचा प्लांट उभारण्यात येणार आहे. या प्रयत्नांत असताना अमरावती येथील पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेजला ५ कोटी रुपयांचा निधी सीएसआर फंडमधूनच उपलब्ध करून दिला. हर्षवर्धन देशमुख या संस्थेचे अध्यक्ष आहेत. तेथे ४०० बेड्सना पाइपलाइनद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा होईल आणि ६०० सिलिंडर्स इतर रुग्णालयांना देण्यात येणार आहे, असे नितीन गडकरींनी यावेळी सांगितले. 

सद्यःस्थिती पाहता ५० पेक्षा जास्त बेड्स असलेल्या हॉस्पिटल्सना हवेतून ऑक्सिजन निर्मिती करण्याचा प्रकल्प उभारणे सक्तीचे केले पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी प्रयत्न करावे. लिक्वीड ऑक्सिजन आणि हवेतून मिळणारा ऑक्सिजन, अशा दोनच प्रकारे आपण ऑक्सिजन मिळवू शकतो. पैकी लिक्वीड ऑक्सिजनसाठी आपण स्टील प्लांट्सवर निर्भर आहोत आणि तिसरी लाट येणार आहे. पण ती कशी राहील हे आपल्याला माहिती नाही. आणि जर का हे प्लांट भविष्यात गडबडले तर आपल्याला ऑक्सिजन मिळणार नाही आणि लोक मरायला लागतील. त्यामुळे आता आपल्याला प्रत्येक जिल्हा ऑक्सिजनच्या बाबतीत परिपूर्ण करावा लागेल आणि त्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, अशी सूचना गडकरी यांनी केली. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com