गडकरींनी त्यांच्या स्टाईलने उदघाटन केले... पण बेड काही उपलब्ध नाही झाले... - gadkari inaugurated with his style but the bed was not available | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई , 7 किलोग्राम यूरेनियमसह 2 जणांना अटक. दोन्ही आरोपी मागिल अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या शोधात होते. जप्त केलेल्या युरेनियमची किंमत बाजारात २१ कोटी रुपये आहे.
गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील घरासमोर अज्ञाताने शेणी पेटवल्या, त्यामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पेटवलेल्या शेणी विझवून तेथून हटविल्या आहेत .

गडकरींनी त्यांच्या स्टाईलने उदघाटन केले... पण बेड काही उपलब्ध नाही झाले...

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

काल गडकरींनी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये कोविडच्या २०० बेड्सचे उद्धाटन केले. त्यानंतर आज गरजुंनी तेथे कॉल करणे सुरू केले. त्यावर लोकांना उपरोक्त उत्तर मिळाले. त्यामुळे संदिग्ध वातावरण तयार झाले. कालच अतुल लोंढे यांनी गडकरी आणि फडणवीसांवर कोरोनाच्या परिस्थितीत गायब असल्याचा आरोप केला होता.

नागपूर : ‘नागपुरात कोरोनाचे थैमान, अन् फडणीस, गडकरी कुठे आहेत?, असा प्रश्‍न महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटिचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी काल विचारला होता. त्याला उत्तर देताना भारतीय जनता पक्षाचे माध्यम प्रमुख विश्‍वास पाठक यांनी गडकरींनी कोरोनासाठी केलेल्या कामांचा पाढाच वाचला. पण वस्तुस्थिती अशी आहे की, काही लोकांनी एनसीआयमध्ये बेडच्या मागणीसाठी कॉल केला असता, किमान आणखी तीन ते चार दिवस बेड उपलब्ध होणार नाहीत, असे सांगण्यात आले. 

नागपुरात कोणत्याही रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हिरच्या तुटवड्याने परिस्थिती भीषण झाली आहे. त्यामुळे काल गडकरींनी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये कोविडच्या २०० बेड्सचे उद्धाटन केले. त्यानंतर आज गरजुंनी तेथे कॉल करणे सुरू केले. त्यावर लोकांना उपरोक्त उत्तर मिळाले. त्यामुळे संदिग्ध वातावरण तयार झाले. कालच अतुल लोंढे यांनी गडकरी आणि फडणवीसांवर कोरोनाच्या परिस्थितीत गायब असल्याचा आरोप केला होता. आजच्या एनसीआयमधील स्थितीमुळे लोंढेंच्या आरोपांना बळ मिळाले. त्यानंतर विश्‍वास पाठक यांनी गडकरींवरील आरोप खोडून काढले. 

याबाबतीत विश्‍वास पाठक यांच्याशी चर्चा केली असता ते म्‍हणाले की, काल गडकरी आणि फडणवीस यांनी उद्घाटन केल्यानंतर जे भाषण केले, अगदी त्याप्रमाणेच व्यवस्था केलेली आहे. ६० बेड्स ‘रेडी टू युज’ होते. त्यांचा वापर सुरूही झाला आहे. त्यातही आधीच कॅन्सरचे २०-२५ रुग्ण कोरोनाबाधित होते. त्यांना तेथे दाखल करण्यात आले. येत्या १५ दिवसांत २०० बेड्स टप्याटप्याने तयार होणार आहेत. त्यानंतर ते वापरामध्ये येतील, असे त्यांनी सांगितले. पण आजच संपूर्ण २०० बेड्स तयार नाहीत, हे त्यांनी स्पष्ट केले. 

हेही वाचा : …म्हणून नाना पटोलेंच्या बोलण्याकडे आम्ही लक्षच देत नाही ः देवेंद्र फडणवीस

विश्वास पाठक यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितल्याप्रमाणे, अतुल लोंढे ज्यांनी पालिका साक्षी निवडणूक लढवली नाही, त्यांनी अतुलनीय काम करणाऱ्या गडकरींवर साधी माहिती न घेता आरोप करणे चुकीचे आहे. गडकरी यांच्या प्रयत्नामुळे ११ हजार रेमडेसिव्हिर मिळाले आहेत. ३० टन ऑक्सिजन मिळवून देण्याची सोय गडकरी यांनी केली. व्हेंटिलेटरचे एक हजार उपलब्ध करून दिले आहेत. एम्स मध्ये जादा बेड उपलब्ध करून दिले आहेत. 

नितीनजी गडकरी यांनी नागपुरातील कोविड स्थितीत आजवर उचललेली पावले -
रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळण्यासाठी ‘सन फार्मा’चे दिलीप सिंघवी यांच्याशी पाच दिवसांपूर्वी दूरध्वनीवरून चर्चा केली होती. त्यानंतर आजवर नागपुरात ४९०० व विदर्भात ५०० इंजेक्शन्स पोहोचले आहेत. ‘मायलॉन लॅबरॉटरीज’चे भारतातील सीईओ राकेश बोमजाई यांच्याशीदेखील त्यांनी दूरध्वनीवरून संपर्क केला होता. त्यानंतर मायलॉनकडून आजवर नागपूरसाठी ६००० रेमडेसिव्हिर इंजेक्शनची पूर्तता करण्यात आली आहे. अवघ्या पाच दिवसात असे एकूण ११४०० रेमडेसिवीर इंजेक्शन्स नागपूरला मिळाले आहेत. रेमडेसिव्हिर इंजेक्शनसंदर्भात पंतप्रधान व केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांच्याशीदेखील त्यांनी दूरध्वनीवरून पाठपुरावा केला असून रेमडेसिवीरची निर्मिती १० लक्ष वायल प्रति महिना वाढवण्यास व नवीन प्रकल्प सुरू करण्यास मंजुरी मिळवून दिली. याचा केवळ नागपूरलाच नाही, तर संपूर्ण राज्याला फायदा होणार आहे. 

नागपूरमध्ये ऑक्सिजनची पूर्तता करण्यासाठी ‘भिलाई स्टील प्लॉट’शी संपर्क साधून ३० टन ऑक्सिजन मिळवून दिले. हा ऑक्सिजन वितरित करण्यासाठी विशाखापट्टणम येथून टँकरचीही सुविधा उपलब्ध करून दिली. नागपूरसाठी पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर (Oxygen Concentrator) मिळवून देण्यासाठीदेखील गडकरीजी प्रयत्नशील असून लवकरच १००० पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नागपुरातील व्हेंटिलेटर्सची आवश्यकता लक्षात घेता विशाखापट्टणम येथील एमपीझेड द्वारा निर्मित (किंमत केवळ २ लक्ष रुपये) १००० व्हेंटिलेटर्स नागपूरकरांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यासाठी आवश्यक सीएसआर फंड उपलब्ध करून देण्यासाठीही नितीन गडकरी प्रयत्नशील आहेत. 

गडकरींच्या प्रयत्नांतून 'नागपूर एम्स'मध्ये केवळ दोन दिवसांत ६० वरून ५०० बेड्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट, नागपूर येथे तातडीने २०० बेड्सना मंजुरी मिळवून देण्यात आली आहे. जी रुग्णालये कोविड रुग्णांच्या उपचारासाठी अतिरिक्त बेड्स वाढवून मागत आहेत, त्यांना २४ तासांत सदर परवानगी मिळवून देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. 'स्पाईस जेट'चे मालक अजय सिंह यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून तातडीने आरटी -पीसीआर टेस्ट करणारी मोबाईल चाचणी किट नागपूरला उपलब्ध करून दिली आहे. ही किट आज रात्री नागपूरला पोहोचणार असून यामधून केवळ ३५० रुपये इतक्या नाममात्र शुल्कात चाचणी करता येणार आहे.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख