…म्हणून नाना पटोलेंच्या बोलण्याकडे आम्ही लक्षच देत नाही ः देवेंद्र फडणवीस - so we do not pay attention to nana patoles speech said devendra fadanvis | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

…म्हणून नाना पटोलेंच्या बोलण्याकडे आम्ही लक्षच देत नाही ः देवेंद्र फडणवीस

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

लहान घटकांना मदत मिळावी, समाजातील छोट्या घटकांकडेही केंद्र सरकारने लक्ष दिले पाहिजे, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले होते. याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, नाना पटोलेंही हा सल्ला त्यांच्या सरकारला दिला पाहिजे.

नागपूर : कोरोनाच्या या परिस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या काही भावना असतील त्या त्यांनी पत्रात मांडल्या आणि केंद्र सरकारला पाठवल्या. त्यावर सरकार काय तो विचार करेल. राहिला प्रश्‍न नाना पटोलेंचा, तर त्यांना हेच कळत नाही की ते सत्तापक्षात आहेत की विरोधी पक्षात. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे आम्ही फार लक्षच देत नाही आणि प्रतिक्रिया तर मुळीच देत नाही, असे राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या स्थितीवर नुकतेच केंद्र सरकारला एक पत्र लिहिले आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी येथील विमानतळावर विचारणा केली असता, त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, पॅन्डॅमिक ही एक आपत्तीच असते. भूकंप आल्यास आपण आपत्ती घोषित करतो आणि एखादा रोग आल्यास पॅन्डॅमिक घोषित करतो. कोरोनासाठी पॅन्डॅमिक घोषित झालेलेच आहे. मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला जर पत्र लिहिलं असेल तर त्यांच्या काही अपेक्षा असतील आणि केंद्र सरकार त्याच्यावर विचार करेल.

लहान घटकांना मदत मिळावी, समाजातील छोट्या घटकांकडेही केंद्र सरकारने लक्ष दिले पाहिजे, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले होते. याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, नाना पटोलेंही हा सल्ला त्यांच्या सरकारला दिला पाहिजे. नानांना हे समजतच नाही की, ते सत्ता पक्षात आहेत की विरोधी पक्षात. त्यामुळे ते काय बोलतात, हे त्यांनाही नेमकं माहिती नसतं. त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर आम्ही सहसा प्रतिक्रियाही देत नसतो. राज्य सरकारने आपली ही काही जबाबदारी आहे, ती केंद्रावर ढकलण्याचा प्रयत्न करू नये. पण केंद्राची मदत जरूर मागितली पाहिजे.   

हेही वाचा : डॉ. राजेंद्र शिंगणे चंद्रपूर जिल्ह्याला तातडीने देणार रेमेडेसिव्हिर...

नागपूरच काय पण राज्यभरात कोरोनाची स्थिती गंभीर होत चालली आहे. या स्थितीवर नियंत्रण मिळविण्याऐवजी अजूनही कोरोनाचे राजकारण केले जात असल्याचा आरोप आता जनतेतून होऊ लागला आहे. पत्रव्यवहार, आरोप-प्रत्यारोप केल्यापेक्षा प्रत्यक्ष मदत उपलब्ध करून देण्याकडे एकाही राजकीय पक्षाचा कल दिसत नसल्याचा आरोप लोक करत आहेत. ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे लोक पटापटा मरू लागले आहे. आतातरी पुढाऱ्यांनी राजकारण न करता रुग्णांसाठी मदत उभी करण्याकडे लक्ष केंद्रित करावे, अशी अपेक्षा व्‍यक्त केली जात आहे.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख