महाराष्ट्र अँटिबायोटिक्सचा निधी एचसीएलकडे वळवला होता, नंतर काय झाले माहिती नाही...

हिंगणा एमआयडीसीतील अनेक उद्योग बंद झाले आहेत. कोरोना महामारीच्या काळात पुन्हा लहान उद्योग बंद होण्याच्या मार्गावर आहेत. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने मंजूर केलेला १०० कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून द्यावा आणि ही कंपनी सुरू करावी.
Hansaraj Ahir
Hansaraj Ahir

हिंगणा (जि. नागपूर) : हिंगणा एमआयडीसीतील महाराष्ट्र अँटिबायोटिक कंपनीला केंद्र सरकारने १०० कोटीचा निधी मंजूर केला होता. त्यावेळी केंद्रीय रासायनिक खते व उर्वरक राज्यमंत्री होतो. मधल्या काळात हा निधी एचसीएल कंपनीकडे वळता करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. राज्य सरकारनेही याचा पाठपुरावा केला नाही. राज्य सरकारही यात अपयशी ठरले आहे. सध्या मी केंद्रात सहभागी नसल्याने याची नेमकी वस्तुस्थिती काय, आहे याची माहिती स्पष्टपणे सांगू शकत नाही, असे माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर म्हणाले.  

कंपनीची जागा व इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे. त्यामुळे ही कंपनी कोरोनाच्या काळात सुरू होणे अपेक्षित आहे. यासाठी राज्य शासनाने पाठपुरावा केला पाहीजे, असेही अहिर म्हणाले. केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करून सहा वर्षांपूर्वी हिंगणा एमआयडीसीतील महाराष्ट्र अँटिबायोटिक्स कंपनीला पुनर्जीवित करण्यासाठी १०० कोटींचा निधी मंजूर केला. मात्र, निधी मंजूर करूनही कंपनी सुरू होऊ शकली नाही. त्यामुळे हा निधी केंद्र सरकारनेच गहाळ केला का, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. ही कंपनी सुरू झाली असती तर कोरोनाच्या काळात आधारवड ठरली असती. 

हिंगणा एमआयडीसीत महाराष्ट्र अॅंटिबायोटिक्स कंपनी कार्यरत होती. ही कंपनी काही वर्षांपूर्वी शासनाने बंद केली. केंद्रात मोदी सरकार सत्तेत येताच पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या पहिल्या वर्षीच्या टप्प्यात शंभर कोटी रुपयांचा निधी या कंपनीला पुनर्जीवित करण्यासाठी मंजूर केला. कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी व केंद्रीय रसायन, खते व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या उपस्थितीत भव्य असा कार्यक्रम पार पडला. यामुळे बंद पडलेली कंपनी पुन्हा सुरू होईल, अशी आशा निर्माण झाली होती. मात्र, उद्‍घाटनानंतर कंपनी सुरू झाली नाही. 

कंपनीला मंजूर केलेला १०० कोटीचा निधी केंद्र सरकारने कुठे वळता केला, हे कळले सुद्धा नाही. कंपनी बंद असली तरी साधन सामग्री उपलब्ध आहे. त्यामुळे १०० कोटीच्या निधीतून कंपनीमधून औषधींचे उत्पादन करणे शक्‍य झाले असते. कोरोना संक्रमणाच्या काळात या कंपनीत कोरोनासाठी लागणारी औषधी तयार करता आली असती. यामुळे हजारो रुग्णांचे जीव वाचविता आले असते. कंपनी सुरू झाली असती तर शेकडो तरुणांना रोजगारही मिळाला असता.

हेही वाचा : 'मन की बात' आहे पण मनातले नाही; सगळंच रामभरोसे आहे!
 
हिंगणा एमआयडीसीतील अनेक उद्योग बंद झाले आहेत. कोरोना महामारीच्या काळात पुन्हा लहान उद्योग बंद होण्याच्या मार्गावर आहेत. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने मंजूर केलेला १०० कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून द्यावा आणि ही कंपनी सुरू करावी अशी मागणी हिंगणा येथील नागरिक करीत आहे. यासाठी भृपुष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यासाठी पुढाकार घ्यावा. अशीही नागरिकांची विनंती आहे. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com