'मन की बात' आहे पण मनातले नाही; सगळंच रामभरोसे आहे! - MNS criticizes Prime Minister Narendra Modi | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

'मन की बात' आहे पण मनातले नाही; सगळंच रामभरोसे आहे!

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 4 मे 2021

लोक आहेत, पण नोकरी नाही. मन की बात आहे, पण मनातले नाही.

मुंबई : कोरोनाच्या महामारीमुळे आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. दुसऱ्या लाटेने देशात थैमान घाले असून, देशात आणि राज्यात रुग्ण आणि नातेवाईकांबरोबर सर्वसामान्यांनाही हालअपेष्टा सोसोव्या लागत आहे. बेड, ऑक्सिजन, अौषधांअभावी, रुग्णांचे जीव जात आहेत. दुसरीकडे हातावर पोट असणाऱ्यांचे कडक निर्बंधांमुळे मोठ्या प्रमाणात हाल होऊ लागले आहेत. या परिस्थितीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ( Narendra Modi ) मुख्यमंत्री उद्धव (Uddhav Thackeray) ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

आता मृतदेहांच्या दागिन्यांचीही होतेय चोरी; कोरोना सेंटरमधील धक्कादायक प्रकार

मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpade) यांनी ट्विट करत देश आणि राज्यात नुसता गोंधळ सुरू असल्याचे म्हटले आहे. देशपांडे म्हणाले की ''लसीकरण आहे, पण लस नाही. खाटा आहेत, पण ऑक्सिजन नाही. उपचार आहेत, पण औषध नाही. व्यापारी आहेत, पण व्यापार नाही. लोक आहेत, पण नोकरी नाही. मन की बात आहे, पण मनातले नाही. मुख्यमंत्री आहेत, पण रस्त्यावर नाहीत. सगळंच रामभरोसे आहे, पण त्यात काहीच राम नाही,'' असे म्हणत देशपांडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.MNS criticizes Prime Minister Narendra Modi

राज्यासह देशातील स्थिती बिकट आहे. राज्यात दररोज ५० ते ६० हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहे. बेड, ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हिरच्या तुटवड्यामुळे महाराष्ट्रात मोठे संकट निर्माण झालेले आहे. राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. मात्र, राज्यात वाढत असलेल्या मृतांच्या संख्येमुळे चिंता कायम आहे.

आता 'महाविकास'चा करेक्ट 'कार्यक्रम होणार' का? 

दुसरीकडे देशातील परिस्थितीही हाताबाहेर जात असल्याचे चित्र आहे. दिल्लीत दररोज ऑक्सिजन अभावी रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. उत्तर प्रदेशातही परिस्थिती चिंताजनक असून, देशात दररोज साडेतीन हजारांच्या वर रुग्णांचा मृत्यू होत आहे. ऑक्सिजन अभावी अनेक राज्यामध्ये रुग्णांचा मृत्यू झाला आहे. निवडणुकांमुळे मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख