बसपचे माजी प्रदेशाध्यक्ष साखरे समर्थकांसह शिवसेनेत दाखल..

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर एकही जागा जिंकता न आल्याने सुरेश साखरे यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपद काढून घेण्यात आले.
Bsp Ex State President Join Shivsena News Nagpur
Bsp Ex State President Join Shivsena News Nagpur

नागपूर ः बहुजन समाज पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी आज आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. (Former BSP state president Sakhare joins Shiv Sena with supporters) शिवसेना महानगर संपर्कप्रमुख आमदार दुष्यन्त चतुर्वेदी यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला.

बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम यांच्या नेतृत्वाखाली सुरेश साखरे यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरवात झाली होती. (Shivsena Mla Dushyant Chaturvedi) १९८५ पासून साखरे हे बहुजन समाज पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते होते.  दरम्यानच्या काळात त्यांच्यावर पक्षाने विविध जबाबदाऱ्या दिल्या होत्या.

गुजरात, मध्यप्रदेश, तेलंगणा, दादर नगरा हवेलीचे प्रभारी म्हणूनही साखरे यांनी काम केले. त्यानंतर बहुजन समाज पक्षाच्या महाराष्ट्राचे अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली.  मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर एकही जागा जिंकता न आल्याने सुरेश साखरे यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपद काढून घेण्यात आले.

एवढेच नाही तर त्यांची  पक्षातून देखील हकालपट्टी  करण्यात आली. गेल्या दीड वर्षापासून ते नव्या पक्षाच्या शोधात होते, आज त्यांनी आपल्या समर्थकांसह शिवबंधन बांधून घेत शिवसेनेत प्रवेश केला.  

कोरोना काळात पुरोगामी महाराष्ट्राला एक सक्षम मुख्यमंत्री मिळाला आहे. ज्यामुळे शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सुरेश साखरे यांनी सांगितले. साखरे व त्यांच्या समर्थकांमुळे भविष्यात  होणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेला फायदा होईल, असा विश्वास आमदार दुष्यन्त चतुर्वेदी यांनी व्यक्त केला आहे. 

राजकीय जोडे बाहेर ठेऊन काम केले पाहिजे ः पंकजा मुंडे

लोणावळा ः ओबीसीच्या या आणि पुढच्या सर्व लढ्यांमध्ये आपण सर्वपक्षीय नेते एकत्र आलो आहोत. ही निर्णयाची आणि निश्चयाची बैठक आहे. निर्णय आपल्याला आजच करायचा आहे. तो म्हणजे या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होऊच नये. त्यासाठी सर्व नेत्यांनी राजकीय जोडे बाहेर ठेऊन या व्यासपीठावर, या आंदोलनात स्वतःला झोकून दिले पाहीजे. राज्य सरकारने न्यायालयात शपथपत्र सादर केले पाहीजे, असे माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.

ओबीसी आरक्षण जिल्ह्यानुसार वेगवेगळे असू शकेल. आरक्षणाचा निर्णय राज्याच्या आकड्यावर झाला पाहिजे. आम्ही स्वतः या विषयासाठी पत्रव्यवहार केला. न्यायालयाने २८ आॅक्टोबर २०१९ ला आम्हाला दोन महिन्याचा वेळ दिला होता. या डाटाचा जनगणनेच्या डाटाशी संबंध नाही.

ओबीसीचे आरक्षण झाल्याशिवाय निवडणुका होणार नाही, असा निर्णय आज येथे झाला पाहिजे. जो कुपोषित आहे, त्याला जास्तीची भाकर वाढणे, म्हणजे आरक्षणे आहे. आज जर आपण आरक्षण वाचवले नाही, तर आपल्या भविष्याला धक्का लागणार आहे, असे मुंडे म्हणाल्या.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com