राज्य सरकारने खात्यात पैसे जमा केले तरी लोकांना वाटते मोदींनी टाकले..

अशोक चव्हाण, अमित देशमुख आदी चांगले नेते या भागात आहेत. अशा अनेक ज्येष्ठ आणि तरुण नेत्यांना सोबत घेऊन मराठवाड्यात पुन्हा परिवर्तन होईल.
Congress Leader Shivajirao Moghe News Aurangabad
Congress Leader Shivajirao Moghe News Aurangabad

औरंगाबाद ः जेष्ठ व नव्या नेते मंडळींना सोबत घेऊन मराठवाड्यात काँग्रेसला गतवैभवव मिळवून देऊ, अशी ग्वाही पक्षाचे प्रदेश समितीचे कार्याध्यक्ष, माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी दिली. मोघे यांनी आज औरंगाबाद शहर व ग्रामीण भागातील काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्षाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला व संघटन बळकटीच्या सूचना केल्या. राज्य सरकार अनेक योजनांच्या माध्यमातून लोकांच्या खात्यात थेट पैसे जमा करत आहे, पण लोकांना वाटते मोदींनीच टाकले, असेही मोघे म्हणाले.

महापालिका, जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीसंदर्भात आढावा घेतला. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते म्हणाले, मराठवाड्यात पूवी काँग्रेससाठी स्थिती चांगली होती. आताही ती तशी असली तरी संघटना पातळीवर आणखी चांगले काम केले जाणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत लढविलेल्या २३ पैकी आठ जागा कॉंग्रेसला मिळाल्या तर लोकसभेत आठपैकी पाच जागा लढवून यश आले नाही.

या भागातील जिल्हा परिषदांतह पक्षाचे सदस्य समाधानकारक आहेत. अशोक चव्हाण, अमित देशमुख आदी चांगले नेते या भागात आहेत. अशा अनेक ज्येष्ठ आणि तरुण नेत्यांना सोबत घेऊन मराठवाड्यात पुन्हा परिवर्तन होईल, अशा पद्धतीन संघटन करू. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

फडणवीसांनी पुन्हा येईनची भाषा करू नये..

गेल्या पाच वर्षात भाजपने केलेल्या कामांचे एक पत्रक काढण्यात आले आहे. परंतु या पत्रकात नोटबंदीचा उल्लेखच नाही. पण शेतकरी, शेतमजूर, असंघटित, सुशिक्षित बेरोजगारांसाठी दरमहा तीन हजार रुपये देण्यात येत असल्याचा उल्लेख केला आहे. परंतु ही मदत मिळालेले नाही, असे हे जुमलेबाजीचे सरकार आहे.

मी परत सत्तेवर आल्यानंतर ओबीसीला आरक्षण देईल, नाहीतर राजकारण सोडून देईल. या फडणवीसांच्या विधानाचा देखील मोघेंनी समाचार घेतला. अनेकदा फडणवीस म्हणतात, की मी परत येईन पण आता ते शक्य नाही. मराठा व ओबीसी आरक्षण हे केंद्राच्या हातात आहे. केंद्राने यासाठी कायदा केला तर ते सहज शक्य होईल. पण याच्या अंगावर ढकला, त्याच्या अंगावर ढकला, मला परत येऊ द्या, अशी भाषा फडणवीस करत आहेत.

केंद्रात त्यांची सत्ता आहे. दरम्यान २०१४ च्या पहिल्या कॅबिनेटमध्ये फडणवीस यांनी शब्द दिला होता की, आम्ही सत्तेवर आलो तर धनगरांचा समावेश आदिवासींमध्ये करू, पण सत्ता आली अन् गेली तरी भाजप धनगरांचे नाव घ्यायला तयार नाही. काँग्रेस चार - दोन कामे करणार नाही परंतु असे खोटे आश्वासन देणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

साडे नऊ लाख आदिवासी बांधवांना प्रत्येकी दोन हजार

काँग्रेसच्या काळात आदिवासी समाजाला खावटी अनुदान मिळत असे. परंतु  भाजप सरकार आले आणि  त्यांनी खावटी अनुदान देणे बंद केले. महाविकास आघाडीचे सरकार आल्याबरोबर आदिवासी बांधवांसाठी ही योजना परत राबवली. दरम्यान राज्यात बारा लाख पैकी साडे नऊ लाख आदिवासी बांधवांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा केले आहेत.

तसेच काईन्स (चटणी ,मीठ) राशन किट हेही देण्यात येत आहे. परंतु काय होते थेट पैसे नागरिकांचे खात्यात गेले की नागरिकांना वाटते की मोदीचे पैसे आले. परंतु ते तसे नाही, हा राज्य शासनाचे पैसे आहे, असेही मोघे म्हणाले. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com