जलयुक्त शिवारवर खर्च मोठा, पण रिझल्ट काहीच नाही..

जलयुक्त शिवार योजनेच्या कामाबाबत लोकं समाधानी नाहीत.
Ncp Leader Jayant Patil challange to Fadnvis News Nanded
Ncp Leader Jayant Patil challange to Fadnvis News Nanded

नांदेड ः जलयुक्त शिवार योजनेवर मोठ्याप्रमाणावर पैसा खर्च झाला, मात्र त्याचा रिझल्ट काहीच आला नाही. कामाचा दर्जा तर एकदम तकलादू होता, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.(Expenditure on water-rich camps is high, but the result is nothing.) 

परिवार संवाद दौऱ्याच्या निमित्ताने जयंत पाटील हे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. उस्मानाबाद, लातूरनंतर ते आज नांदेड जिल्ह्यात होते. (Ncp State President Jayant Patil) यावेळी पत्रकारांनी त्यांना जलयुक्त शिवार योजने संदर्भात प्रश्न विचारला. पाटील म्हणाले, जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करावी, अशी मागणी सव्वा वर्षापूर्वी करण्यात आली होती. त्याची चौकशी सुरू असावी.

जलयुक्त शिवार योजनेत ७२ टीएमसी पाणी अडवल्याची घोषणा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. (Jalyukt Shiwar yojna)  परंतु ७२ टीएमसी पाणी म्हणजे एका धरणाचे पाणी आहे. मात्र त्यांनी सांगितलेली परिस्थिती खरी नाही, जलयुक्त शिवार योजनेच्या कामाबाबत लोकं समाधानी नाहीत.

लोकांचे प्रश्न हाती घ्या, ते आपल्या पाठीशी नक्की उभे राहतात..

लोकांच्या हिताचे प्रश्न हाती घेतले तर आपल्यापाठी लोक नक्की उभे राहतात, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना व्यक्त केला. राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्‍याच्या तिसऱ्या दिवशी नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे पाटील यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली.

यावेळी बोलतांना जयंत पाटील म्हणाले, पक्ष मजबूत करायचा असेल तर पक्षाचे सगळे सेल मजबूत करायला हवेत. या लोहा - कंधार मतदारसंघात विजय कुणाचा झाला त्यापेक्षा पक्षाचा पराभव कसा झाला, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  बुथवरील कमिट्यांनी झटून काम केले पाहिजे, आपली वरवरची रचना असता कामा नये.

वाडी-वस्त्यांमध्ये गेल्याशिवाय बुथ कमिट्यांचे हे नेटवर्क मजबूत होणे शक्य नाही.
प्रयत्नांती परमेश्वर असतो त्यामुळे प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे, असे आवाहनही जयंत पाटील यांनी यावेळी केले. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. 
 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com