आधी ५ मोठ्या झाडांचे प्रत्यारोपण यशस्वी करून दाखवा; बाजपेयींची मागणी...

५० वर्षे वयाचे १ वृक्ष तोडून १० वृक्ष जरी लावले तरी त्याची क्षती २५ वर्ष भरून निघणार नाही. करिता आपणास नम्र व कळकळीचे निवेदन व विनंती करण्यात येते की, उपरोक्त विविध प्रजातींची वृक्ष तोडण्याची परवानगी देण्यात येऊ नये.
Inter Moden Station Nagpur
Inter Moden Station Nagpur

नागपूर : अजनी येथे इंटर मॉडेल स्टेशन Inter Model Station उभारण्यासाठी जवळपास ४ ते ५ हजार झाडांची कत्तल करण्याची परवानगी Permission to cut down 4 to 5 thousand trees प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी महानगरपालिकेला मागितली आहे. यावर पर्यावरणवाद्यांचा आक्षेप आहे. आधी ५ मोठ्या झाडांचे प्रत्यारोपण यशस्वी करून दाखवा first show the success of transplanting five big trees मगच प्रत्यारोपणाची परवानगी द्या. पण हे करताना सामाजिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांच्या देखरेखीखाली हे कार्य करावे, अशी मागणी तेजस सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा सिनेट सदस्य ॲड. मनमोहन बाजपेयी Ad. Manmohan Bajpayee यांनी केली आहे. 

नागपूर महानगर पालिकेचे वृक्ष अधिकारी तथा उद्यान अधीक्षकांना दिलेल्या पत्रात ॲड. बाजपेयी यांनी विविध प्रजातीचे डेरेदार वृक्ष तोडण्यावर आक्षेप घेतला आहे. पत्रात ते म्हणतात, ‘नागपूर नगरीचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या अजनी येथील जवळपास 4 ते 5 हजार विविध प्रजातीची झाडे विकास कामासाठी तोडण्याची परवानगी आपणास प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांनी मागितली आहे. मागील दीड वर्षांपासून कोरोना महामारीने जगासह भारतात थैमान घातले आहे. एप्रिल २०२१ ला नागपूरमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला होता ऑक्सिजन टंचाई मुळे अनेक निष्पाप जीव आपल्या प्राणाला मुकले.

अजूनही कोरोनाचे सावट संपलेले नाही अशा वेळी ऑक्सिजनचा नैसर्गिक स्रोत असलेले, पर्यावरण व विविध पक्षी, जीव, जंतू यांचे आश्रयस्थान असलेले विविध प्रजातीची झाडे तोडण्यात परवानगी देणे म्हणजे मुक्या प्राण्यांसह मनुष्य जातीवर मोठा आघात आहे. विकास करणे हेही तितकेच आवश्यक आहे आणि तो जरूर करावा. मात्र विकास करत असताना पर्यावरणाची हानी अजिबात होऊ नये, याची काळजी घेणे काळाची गरज आहे. वृक्षतोड न करता विकास जरूर करा, थोडा अडेलपणा (अट्टहास) सोडून विचार केला तर ते शक्य आहे. 

वृक्ष प्रत्यारोपण करण्याच्या गोंडस नावाखाली परवानगी मागितली आहे. मात्र ही प्रक्रिया फारशी यशस्वी नाही, खरंच ते शक्य असेल तर आधी ५ मोठ्या झाडांचे प्रत्यारोपण यशस्वी करून दाखवा व नंतर प्रत्यारोपणाची परवानगी देताना सामाजिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांच्या देखरेखीखाली हे कार्य करण्यास परवानगी देण्यास हरकत नाही. कापलेल्या झाडांऐवजी दुसरीकडे वृक्षारोपण म्हणजे निव्वळ धूळफेक आहे. असे वृक्षारोपण झालेली झाडे नंतर जगले की वाचले यावर देखरेख ठेवणारी यंत्रणा सक्षम नाही. 

५० वर्षे वयाचे १ वृक्ष तोडून १० वृक्ष जरी लावले तरी त्याची क्षती २५ वर्ष भरून निघणार नाही. करिता आपणास नम्र व कळकळीचे निवेदन व विनंती करण्यात येते की, उपरोक्त विविध प्रजातींची वृक्ष तोडण्याची परवानगी देण्यात येऊ नये व प्रत्यारोपण करताना उपरोक्त अट टाकून सशर्त परवानगीचा विचार करावा. मनुष्य जातीला व पशू पक्ष्यांना बाधा पोहोचवू नये. म्हणून अशी परवानगी देण्यास आम्हा पर्यावरणवाद्यांचा कठोर आक्षेप आहे.’
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com