शेतकरी आत्महत्या ५३, प्रकरण पात्र ४, प्रशासन वाचवत आहे सरकारचा पैसा...

चार प्रकरण शेतकरी आत्महत्येच्या निकषात दर्शवून मदतीस पात्र ठरविण्यात आले. यातील २ प्रकरणे जानेवारी २०२० मधील आहे, तर २ प्रकरणे मे २०२० मधील आहेत. ४ प्रकरण पात्र ठरविण्यात आले असताना आता पर्यंत २ प्रकरणात मदत देण्यात आली.
Farmer Suicide
Farmer Suicide

नागपूर : शेतकरी आत्महत्या हा विदर्भाला लागलेला शाप आहे. Farmer suicide is a curse on Vidarbha शेतकरी आत्महत्या झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना १ लाख रुपये देण्याची तरतूद आहे. There is a provision of Rs. 1 lakh पण सद्यःस्थितीत सरकार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याच्या मानसिकतेत दिसत नाहीये. याचे कारण म्हणजे नागपूर जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येची ५३ प्रकरणे झाली There were 53 cases of farmer suicide in Nagpur district आणि प्रशासनाने केवळ ४ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतीस पात्र ठरविले आहे. उर्वरित ४९ कुटुंबीयांच्या बाबतीत कुठलाही विचार करण्यात आलेला नाही. No thought was given

गेल्या सव्वा वर्षात नागपूर जिल्ह्यात ५० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. परंतु यातील फक्त ४ प्रकरण पात्र ठरवून कुटुंबीयांना मदत मंजूर करण्यात आली. जिल्हा प्रशासनाकडून आत्महत्येची प्रकरणे अपात्र करून शासनाचा निधी वाचविण्यावर भर दिला जात असल्याचे दिसते. 

मागील वर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. सोयाबीन पिकाच्या नुकसानाची मदत अद्याप मिळाली नाही. पुरामुळे झालेल्या नुकसानाची पूर्ण मदत दिली नसल्याची कबुली मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलीच आहे. अनेक शेतकऱ्यांनी कर्जाची पूर्ण रक्कम फेडली नसल्याचे सांगण्यात येते. जानेवारी २०२० ते मार्च २०२१ दरम्यान नागपूर जिल्ह्यात ५३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. 

कर्जबाजारीपणा, बॅंकेकडून कर्जाच्या रकमेसाठी तगादा लावण्याच्या कारणावरून शेतकऱ्याने आत्महत्या केल्यास संबंधिताच्या कुटुंबीयांस १ लाखाची मदत देण्यात येते. परंतु या काळात जिल्हा प्रशासनाकडून फक्त ४ प्रकरण मदतीस पात्र ठरविण्यात आले. तर ४९ प्रकरण मदतीस अपात्र ठरविण्यात आले आहेत. 

वर्षभरानंतरही मदत निधी नाही
चार प्रकरण शेतकरी आत्महत्येच्या निकषात दर्शवून मदतीस पात्र ठरविण्यात आले. यातील २ प्रकरणे जानेवारी २०२० मधील आहे, तर २ प्रकरणे मे २०२० मधील आहेत. ४ प्रकरण पात्र ठरविण्यात आले असताना आता पर्यंत २ प्रकरणात मदत देण्यात आली. मे मध्ये पात्र ठरविण्यात आलेल्या पात्र प्रकरणातील शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना वर्षभराचा कालावधी होत असताना अद्याप मदत निधी देण्यात आला नाही. त्यामुळे प्रशासन या विषयाबाबत किती गंभीर आहे, हे लक्षात येते.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com