फडणवीस यांनी का केला वकिलाविरोधात मानहानीचा दावा?

फडणवीस यांनी या आरोपांचे खंडन केले आहे.
 Devendra Fadnavis .jpg
Devendra Fadnavis .jpg

मुंबई : नागपूरमध्ये पाच वर्षांपूर्वी झालेल्या वास्तुविशारद एकनाथ निमगाडे यांच्या खळबळजनक हत्या प्रकरणात आपल्यावर आरोप करणाऱ्या अॅड. उज्ज्वल उके यांच्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महानगर दंडाधिकारी न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा ठोठावला आहे.

नागपुरात १६ सप्टेंबर २०१६मध्ये निमगाडे यांची रस्त्यावर गोळ्या झाडून हत्या झाली होती. कोट्यवधी रुपयांच्या जमिनीच्या वादातून हत्या घडवण्यात आली, असा दावा पोलिसांकडून करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सध्या सीबीआयकडे आहे. अॅड. उके यांनी दोन महिन्यांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणात फडणवीस यांचा सहभाग आहे, असा धक्कादायक आरोप केला होता.

फडणवीस यांनी या आरोपांचे खंडन केले आहे. तसेच अॅड. उके यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. मंगळवारी न्यायालयाने या प्रकरणी फडणवीस यांचा जबाब नोंदविला. न्यायालयाने ३० मे रोजी यावर पुढील सुनावणी निश्चित केली आहे. 

दरम्यान, देवेंद्र फडणवीस  Devendra Fadnavis यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. "योग्य वेळी आम्ही राज्य सरकारचा करेक्ट कार्यक्रम करू," असं विधान फडणवीस यांनी एका मुलाखतीत केलं आहे. 

पंढरपूर पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी ही जागा भाजपला द्या, या सरकारचा करेक्ट कार्यक्रम करतो, असं विधान केलं होतं. देवेंद्र फडणवीसांच्या या विधानानंतर राज्यात ऑपरेशन लोटसचे संकेत देण्यात आले होतं. आता त्यांनी पुन्हा असं व्यक्तव्य केलं आहे. फडणीस म्हणाले, "सध्या आमच लक्ष कोरोना स्थिती कशी आटोक्यात आणता येईल यावर आहे.  मात्र, योग्य वेळी आम्ही राज्य सरकारचा करेक्ट कार्यक्रम करू"

फडणवीस म्हणाले की, कोरोनाच्या दुस-या लाटेसंदर्भात केंद्र सरकार सतत राज्य सरकारला सुचना करत होत, मात्र राज्य सरकारने नियोजन शून्यता दाखवली, त्यामुळे ॲाक्सिजन अभावी अनेकांचा मृत्यू झाला. ॲाक्सिजन प्लॅान्ट वेळेत उभे केले असते तर अनेक रूग्णांचे प्राण वाचवू शकलो असतो.

तैाते वादळाच्या नुकसानीबाबत फडणवीस म्हणाले की,  देशातील अनेक राज्यात तैाते वादळामुळे नुकसान केलं आहे. १००० कोटींची मदत गुजरातला करण्यात आली. त्यांच्या प्रेस नोटमध्ये अस देखील सांगितल आहे कि इतर राज्यांना मदत लवकरच मिळणार आहे. इतर कोणत्याही राज्यांनी मदत मिळणार नाही अस म्हटलं नाही, मात्र फक्त महाराष्ट्रातील मंत्र्यांची स्क्रिप्ट तयार करुन केंद्रावर टीका केली आहे.   

Edited By - Amol Jaybhaye  


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com