फडणवीसांनी नगरसेवकांना दिला इशारा, म्हणाले गैरसमजात राहू नका...

ही आपली वस्ती, आपला बालेकिल्ला, असा समज काही नगरसेवकांनी करून घेतला आहे. त्यांच्या भागात संघटनेचा पदाधिकारी गेला तरी त्याला खटकते. तो त्याला प्रतिस्पर्धी समजतो. मात्र, कोणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय पक्ष घेतो.
Devendra Fadanvis Warning
Devendra Fadanvis Warning

नागपूर : नागपूर महानगरपालिका निवडणुकीला Nagpur Corporation Election आता सहा महिनेच उरले आहेत. भाजपसह सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Leader of Opposition Devendra Fadanvis यांनी काल येथे नगरसेवकांची बैठक घेतली. नगरसेवक आणि संघटनेचे पदाधिकारी यांच्यातील संघर्ष आता लपून राहिलेला नाही. त्यामुळे माझी तिकीट कुणी कापू शकत नाही, या गैरसमजात राहू नका, असा इशारा फडणविसांनी नगरसेवकांना दिला. Don't be misunderstood, Fadanvis warned to corporators. 

काल विमानतळावर पत्रकारांसोबत वार्तालाप केल्यानंतर फडणवीस थेट नगरसेवकांच्या बैठकीला गेले. तेथे त्यांनी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनाही कानपिचक्या दिल्या. एकाच प्रभागातील नगरसेवकांमध्ये सतत कुरबुरी सुरू असतात. झालेल्या कामांचे श्रेय घेण्यावरूनही नगरसेवकांमध्ये नेहमी वाद होत असल्याची माहिती फडणविसांना मिळाल्यामुळे त्यांनी कालच्या बैठकीत नगरसेवकांची चांगलीच कानउघाडणी केली. सोबतच पक्षाची शिस्त जपा, आपल्यामुळे पक्षाचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्या, असा वडीलकीचा सल्लाही दिला. 
 

भाजपचे मिशन महापालिका सुरू झाले आहे. त्यामुळे आपसात स्पर्धा करणाऱ्या नगरसेवकांवर आमचे लक्ष आहे. त्यांनी हे प्रकार तात्काळ बंद करून एकजुटीने काम करावे, असेही त्यांनी सांगितले. महापालिका निवडणुकीला सहा महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. चारचा प्रभाग असल्याने काही मोजकेच नगरसेवक काम करीत आहेत. दुसरीकडे आपल्यापेक्षा दुसरा मोठा होऊ नये, याची पुरेपूर काळजी काहीजण घेत आहेत. विकासकामांवरून श्रेयवादासाठी चढाओढसुद्धा भाजपमध्ये सुरू आहे. 

संघटनेचे पदाधिकारी आणि नगरसेवक यांच्यातही कुरुबुरी सुरूच आहेतच. ही बाब हेरून फडणवीस यांनी भाजपचे पदाधिकारी आणि नगरसेवकांना सर्वांना भविष्यात कसे काम करावे याविषयी मार्गदर्शन केले. बैठकीला भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, महापौर दयाशंकर तिवारी, सत्तापक्षनेते अविनाश ठाकरे, स्थायी समितीचे अध्यक्ष प्रकाश भोयर, आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते यांच्यासह आजी-माजी आमदार उपस्थित होते. 

नगरसेवकांना इशारा 
ही आपली वस्ती, आपला बालेकिल्ला, असा समज काही नगरसेवकांनी करून घेतला आहे. त्यांच्या भागात संघटनेचा पदाधिकारी गेला तरी त्याला खटकते. तो त्याला प्रतिस्पर्धी समजतो. मात्र, कोणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय पक्ष घेतो. कोणीही आपले तिकीट कोणी कापू शकत नाही, असा गैरसमज करून घेऊ नका, असे सांगून फडणवीस यांनी काही नगरसेवकांना अप्रत्यक्ष इशारा दिल्याचे समजते.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com