प्रसेनजीत पाटलांच्या येण्याने बुलडाणा जिल्ह्यातील अजून एक जागा भक्कम…

प्रसेनजीत पाटील यांच्यामागे सर्वांनी खंबीरपणे उभे राहावे. आपल्या भागातील धरणाचे काम अधिक जलद गतीने करून आपला पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा आमचा प्रयत्न आहे.
Sarkarnaa Banner
Sarkarnaa Banner

मुंबई : आज मुंबईतील राष्ट्रवादी भवनामध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील State President of NCP Jayant Patil व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार Dupty Chief Minister Ajit Pawar यांच्या प्रमुख उपस्थितीत कापूस पणन महासंघाचे संचालक तथा जळगाव जामोद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रसेनजीत पाटील Prasenjeet Patil यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. स्वगृही परतलेल्या प्रसेनजीत पाटील यांच्या येण्याने बुलडाणा जिल्ह्यातील Buldana District राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अजून एक जागा भक्कम झाल्याचा विश्वास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रसेनजीत पाटील यांच्यामागे सर्वांनी खंबीरपणे उभे राहावे. आपल्या भागातील धरणाचे काम अधिक जलद गतीने करून आपला पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. २०२४च्या निवडणुकीआधी हे काम पूर्ण करण्याचा विश्वास जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला. प्रसेनजीत पाटील यांच्या प्रवेशाने विदर्भात पक्षाला अधिक बळकटी मिळणार आहे. प्रतिकूल परिस्थिती बदलते, आपण जिद्द सोडायची नसते. आगामी सर्व निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच झेंडा फडकला पाहिजे, अशा जोमाने सर्वांनी कामाला सुरुवात करा, असे आवाहन अजित पवार यांनी यावेळी उपस्थितांना केले. 

तसेच यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच विधान परिषद सदस्य आमदार अरूणकाका लाड यांच्या पुढाकाराने भाजपचे सांगली जिल्हा परिषद सदस्य नितीन नवले यांनीही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेश कार्यक्रमाला बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, माजी आमदार उदयसिंग पाडवी, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे उपस्थित होते.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने राज्यात एक एक जिल्हा भक्कम करणे सुरू केले आहे. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी त्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढला. विदर्भाच्या दौऱ्यातही त्यांनी कार्यकर्त्यांची भक्कम फळी जोडली. पूर्व विदर्भात कधी नव्हे ते ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल क्रियाशील झाले. नागपूर जिल्ह्यातही खांदेपालट करण्यात आली. आगामी निवडणुकांची ही तयारी समजली जात आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विदर्भ दौऱ्यात स्वबळाची भाषा केली. त्याचा पुनरुच्चार त्यांनी जळगावातील दौऱ्याच्या सुरुवातीला केला. त्यामुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी केल्याचे दिसतेय. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com