डॉ प्रज्ञा सरवदे करणार दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास... - dr pradnya saravade will investigate the case of deepali chavan suicide | Politics Marathi News - Sarkarnama

डॉ प्रज्ञा सरवदे करणार दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास...

अरूण जोशी
शनिवार, 3 एप्रिल 2021

दीपाली चव्हाण यांच्या तक्रारीची रेड्डी यांनी वेळीच दखल घेतली नाही आणि काहीच कार्यवाही केली नसल्याचे आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. वन विभाग आणि वन मुख्यालयाकडे त्याबाबतच्या लोकप्रतिनिधी आणि संघटनांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार शिवकुमार यांच्या गैरकृत्यावर एक प्रकारे श्रीनिवास रेड्डी यांनी पांघरूण घातल्याचे दिसते.

अमरावती : वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. त्यानंतर राज्यभर खळबळ उडाली. विनोद शिवकुमार बाला यांच्याइतकेच एम.एस. रेड्डी हे देखील या घटनेसाठी दोषी आहेत, अशी ओरड राज्यभर होत आहे. आता या प्रकरणाचा तपास अप्पर पोलिस महासंचालक डॉ. प्रज्ञा सरवदे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. तसे पत्र मुख्य वनसंरक्षक अरविंद आपटे यांनी दिले आहे. 

आपल्या पत्रात श्री आपटे म्हणतात, गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांनी वेळोवेळी दीपाली चव्हाण यांना मानसिक त्रास दिला आहे. त्यामुळे कंटाळून शेवटी त्यांनी २५ मार्चला रात्री ८ वाजता त्यांच्या मुख्यालयात स्वतःच्या शासकीय निवासस्थानी शासकीय पिस्तुलाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेला शिवकुमार दोषी आहेत, अशी तक्रार प्राप्त झाली आहे. त्यांच्या विरोधात धारणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लगेच २६ मार्चला त्यांना निलंबितही करण्यात आले. दीपाली यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये नमूद केल्याप्रमाणे शिवकुमार यांच्याकडून त्यांचा छळ होत असल्याची त्यांनी वारंवार श्रीनिवास रेड्डी यांच्या निदर्शनास आणून दिली होती. 

दीपाली चव्हाण यांच्या तक्रारीची रेड्डी यांनी वेळीच दखल घेतली नाही आणि काहीच कार्यवाही केली नसल्याचे आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. वन विभाग आणि वन मुख्यालयाकडे त्याबाबतच्या लोकप्रतिनिधी आणि संघटनांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार शिवकुमार यांच्या गैरकृत्यावर एक प्रकारे श्रीनिवास रेड्डी यांनी पांघरूण घातल्याचे दिसते. त्यामुळे शिवकुमारइतकच रेड्डीदेखील जबाबदार असल्याने त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून आवश्‍यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 

हेही वाचा : नाशिकला २८ हजार २३१ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे तत्कालिन अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक व श्रेत्र संचालक रेड्डी यांनी आपली जबाबदारी वेळेत पार न पाडल्यामुळे दीपाली चव्हाण यांना आत्महत्या करावी लागली. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण मंहामडळ मर्यादित मुंबईचे अपर पोलिस महासंचालक व सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रज्ञा सरवदे करणार आहेत. त्या ३० एप्रिलपर्यंत चौकशी अहवाल मुख्य वन संरक्षक यांना सादर करणार आहेत. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख