नाशिकला २८ हजार २३१ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख ५८ हजार ६४५ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत २८ हजार २३१ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत २ हजार ४२५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
corona
corona

नाशिक : जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख ५८ हजार ६४५ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत २८ हजार २३१  रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत २ हजार ४२५  रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

सध्या शहर व जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आणन्यासाठी प्रशासन सक्रीय आहे. त्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे चाचण्या, लसीकरण व उपचाराच्या सुविधांवर भर देण्यात येत आहे. शहर व जिल्ह्यातील सध्या उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्णांची सख्या अशी, ग्रामीण भागात नाशिक ५८४, चांदवड १ हजार ४०, सिन्नर ५७३, दिंडोरी ५१९, निफाड १ हजार ६७०, देवळा  ८७१ , नांदगांव ५१५, येवला ३६४, त्र्यंबकेश्वर १६८, सुरगाणा १५२, पेठ ६१, कळवण ४१५,  बागलाण १ हजार ८३, इगतपुरी ३७१, मालेगांव ग्रामीण ८३१ असे एकूण ९ हजार २१७ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १६ हजार ९२७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ८७९  तर जिल्ह्याबाहेरील २०८ असे एकूण २८ हजार २३१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  १ लाख ८९ हजार ३०१  रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.७४ टक्के
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ८२.७१ टक्के, नाशिक शहरात ८४.७८ टक्के, मालेगाव मध्ये  ७६.६५ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८८.७४ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८३.८१  इतके आहे. नाशिक जिल्ह्यात ९९० नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  १ हजार १५८,  मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून २०६  व जिल्हा बाहेरील ७१ अशा एकूण २ हजार ४२५  रुग्णांचा मृत्यु झाला आहे. एक लाख ८९ हजार ३०१ कोरोनाबाधित रुग्णांपैकी १ लाख ५८ हजार ६४५ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आले आहे. तसेच सध्या जिल्ह्यात २८  हजार २३१  पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. 
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com