कोविड केंद्रात मद्याचे प्याले नाचवत कर्मचाऱ्यांनी धरला ‘ताल’, व्हिडिओ व्हायरल... - in covid center employees drunk and dance video viral | Politics Marathi News - Sarkarnama

कोविड केंद्रात मद्याचे प्याले नाचवत कर्मचाऱ्यांनी धरला ‘ताल’, व्हिडिओ व्हायरल...

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 11 जून 2021

रात्री झालेल्या या ओल्या पार्टीचा व्हिडिओ बाहेर आला आणि एकच खळबळ उडाली. मनपाने सारवासारव करण्यासाठी आठ कंत्राटी कामगारांना तत्काळ कामावरून कमी केले.

चंद्रपूर : कोरोनाचा प्रकोप आता कमी होत चालला आहे. त्यामुळेच की काय कोविड केंद्रावरील कर्मचारीही ‘रिलॅक्स’ होण्याच्या मुडमध्ये आले असावे. the staff of the covid center must be in relax mood म्हणूनच येथील महानगरपालिकेच्या Municipal Corporation कोविड केंद्रात कर्मचाऱ्यांनी ओली पार्टी जोरात साजरी केली. मद्याचे प्याले रिचवत, संगीताच्या तालावर नृत्याविष्कार Dancing सादर केले. त्यानंतर मांसाराहारावरही ताव मारला. पण या पार्टीचा व्हिडिओ व्हायरल Video Viral झाल्याने महानगरपालिकेची मात्र चांगलीच आफत झाली आहे. 

चंद्रपूर महानगर पालिकेच्या कोविड रुग्णालयात एका कर्मचाऱ्याच्या वाढदिवसानिमित्ताने तेथील परिचारक आणि इतर कर्मचाऱ्यांनी साग्रसंगीत ओली पार्टी केली. यातीलच एकाने याचे आपल्या मोबाईल फोनवर चित्रीकरण केले. सध्या चित्रफीत समाज माध्यमांवर धुमाकूळ घातला असून कोविड रुग्णालयातील या धिंगाण्याने मनपाची चांगलीच फजिती झाली आहे. सारवासारव करण्यासाठी आठ कंत्राटी कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कामावरून कमी करण्यात आले आहे. 

चंद्रपुरातील वाहतूक शाखेसमोर मनपाच आसरा नावाचे कोविड रुग्णालय आहे. कोविडच्या काळात मनपावर प्रचंड टिका झाल्यानंतर याच ठिकाणी ४५ खाटांचे आसरा नामक कोविड रुग्णालय उभारण्यात आले. यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला गेला. सध्या या रुग्णालयात आठ कोरोना रुग्ण उपचार घेत आहे. कोरोनात विलगीकरण महत्वाचे असते. या रुग्णालयात मात्र काल वेगळाच प्रकार झाला. एका कर्मचाऱ्याचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने रात्र पाळीतील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी एक पार्टी आयोजित केली. महिला परिचारिकांसाठी एका वेगळ्या खोलीत नाश्‍त्याची व्यवस्था करण्यात आली. दुसऱ्या खोलीत मात्र पुरुष कर्मचाऱ्यांनी एकच धुमाकूळ घातला. हातात मद्याचे प्याले आणि संगीताच्या तालावर या कर्मचाऱ्यांनी आपली ‘नृत्याविष्कार’ दाखविण्याची हौस भागवली. त्यानंतर मांसाहारी जेवणावर ताव मारला. 

हेही वाचा : अजितदादांनी ठेकेदाराला घेतले फैलावर; पोलिसांची कामे अशी करतो...  

दरम्यान हा धिंगाणा कुणीतरी आपल्या मोबाईल फोनवर चित्रित केला. याची लेखी तक्रार मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडे करण्यात आली.  या प्रकरणाची कुठेही वाच्यता होणार नाही. याची पुरेपूर दक्षता मनपा प्रशासनाने घेतली. मात्र रात्री झालेल्या या ओल्या पार्टीचा व्हिडिओ बाहेर आला आणि एकच खळबळ उडाली. मनपाने सारवासारव करण्यासाठी आठ कंत्राटी कामगारांना तत्काळ कामावरून कमी केले. यासंदर्भात मनपाचे एकही अधिकारी बोलायला तयार नाहीत. पार्टी झाल्याची तक्रार आहे, या माहितीला मात्र त्यांनी दुजोरा दिला. दरम्यान या ओल्या पार्टीचे चित्रीकरण शंकर नामक चौकीदाराने केल्याची माहिती आहे. त्याच विरोधात डॉक्टरांनी तक्रार केल्याचे समजते.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख