मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नाही : नरेंद्र पाटील 

वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणाबाबत त्यांची भूमिका सतत बदललेली आहे. मराठा आरक्षणाबाबत त्यांनी वेळोवेळी केलेल्या भाष्यात फरक आहे. आता आरक्षण संपले आणि मिळूच शकणार नाही, हे स्पष्ट झाले तेव्हा त्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला असल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले.
maratha arakshan
maratha arakshan

अकोला : मराठा आरक्षण ज्यांना कधी कळलेच नाही, अशांना समन्वयक बनवण्यात आले. त्यामुळे कसे मिळणार आरक्षण असा प्रश्‍न करीत मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नाही, chief minister does not want to give reservation to maratha community असा आरोप माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील Narendra Patil यांनी केला. महाविकास आघाडी सरकार मराठा आणि ओबीसी समाजात भांडण लावण्याचे काम करीत असल्याचेही ते म्हणाले. The work of creating strife in the Maratha and OBC communities

मराठा समाजाला भाजपच्या सत्ता काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण मिळवून दिले होते. मात्र, विद्यमान महाविकास आघाडी सरकारला ते टिकविता आले नाही. आरक्षणासाठी आता मराठा समाजाने रस्‍त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही, भाजप या आंदोलनाला पूर्ण साथ देईल, असे पाटील म्हणाले. मराठा महासंघाचे संस्थापक आमदार स्व. अण्णासाहेब पाटील याचे चिरंजीव तथा अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील हे मराठा आरक्षणाच्या मुद्द्य़ावरून समाज नेत्यांच्या भेटीगाठीसाठी व आंदोलनाची दिशा ठरविण्याकरिता विदर्भ दौऱ्यावर आहेत. रविवारी त्यांनी अकोला येथे मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांसोबत बैठक घेतल्यानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर, ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, माजी जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, डॉ. शंकरराव वाकोडे, गिरीष जोशी आदींची उपस्थिती होती. 

यावेळी बोलताना नरेंद्र पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मराठा समाज रस्त्यावर आल्याशिवाय महाविकास आघाडी सरकारचे डोळे उघडणार नाही, असे सांगितले. लोकशाही पद्धतीने मराठा समाज आपला लढा उभारणार आहे. यासाठी सर्वांनी एकत्र यावे, अशी हाक त्यांनी दिली. त्यापूर्वी त्यांनी मराठा समाजातील काही निवडक कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यात प्रदीप खाडे, डॉ. अमोल रावणकर, सुनील जानोरकर, संजय लुंगे, संजय राऊत, डॉ. शंकरराव वाकोडे, डॉ. संजय सरोदे, अरविंद कपले, विजय बोरकर, मंगेश पाथरीकर, सुरेश गाडे आदींसह अनेक मराठा समाजातील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. 

मुख्यमंत्र्यांचीच इच्छा नाही
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात जे प्रयत्न झाले त्यामुळे हायकोर्टात आरक्षण टिकले. मात्र, विद्यमान महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छा नाही, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या वेळी त्यांनी योग्य समन्वय राखला नाही, असा आरोप नरेंद्र पाटील यांनी केला.

ज्यांना आरक्षण कळले नाही, ते समन्वयक
मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना काँग्रेसचे अशोकराव चव्हाण यांच्याकडे जबाबदारी होती. काँग्रेसने कधीच मराठ्यांना आरक्षण दिले नाही. त्यामुळे आरक्षण काय आहे, हेच अशोकरावांना कळले नसल्याचा आरोपही नरेंद्र पाटील यांनी केला. 

आंबेडकरांची भूमिका सतत बदललेली
वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणाबाबत त्यांची भूमिका सतत बदललेली आहे. मराठा आरक्षणाबाबत त्यांनी वेळोवेळी केलेल्या भाष्यात फरक आहे. आता आरक्षण संपले आणि मिळूच शकणार नाही, हे स्पष्ट झाले तेव्हा त्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला असल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com