चंद्रशेखर बावनकुळेंना ‘यामुळे’ येतोय सरकारवर संशय... - chandrashekhar bawankule has doubts on the government because of this | Politics Marathi News - Sarkarnama

चंद्रशेखर बावनकुळेंना ‘यामुळे’ येतोय सरकारवर संशय...

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 20 जुलै 2021

ओबीसींची माहिती सरकारकडे नाही अन् आयोगाकडेही नाही. त्यामुळे आरक्षण मिळणार कसे, हा प्रश्‍न आहे. इम्पेरिकल डाटा तयार करण्याचे काम सरकारने अजूनही सुरू केले नाही.

नाशिक : शरद पवार, बाळासाहेब थोरात आण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Sharad Pawar, Balasaheb Thorat and Chief Minister Uddhav Thackeray हे सरकारचे चालक आहेत, ओबीसी आरक्षण मिळावे, असे त्यांना वाटत नाही. ते झारीतील शुक्राचार्य आहेत. राज्य सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ Vijay Wadettiwar and Chagan Bhujbal ओबीसींसाठी आंदोलने करतात, मोर्चे काढतात. पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काहीच बोलत नाही, त्यामुळे सरकारवर संशय येतोय, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळेChandrashekhar Bawankule आज म्हणाले.

आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत ओबीसींच्या मुद्यावर बावनकुळे सरकारवर चांगलेच बरसले. ते म्हणाले, मी स्वतः २०१९ मध्ये छगन भुजबळ साहेबांना जाऊन भेटलो होतो आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्‍नावर लक्ष घाला, अशी विनंती केली होती. मात्र त्यांनी मागणीकडे साफ दुर्लक्ष केले, असे आजच्या परिस्थितीवरून दिसते. राज्य सरकारने विधान मंडळाचा गैरवापर केला. केंद्राने डाटा द्यावा, हा चुकीचा ठराव सरकारने केला आहे. ओबीसींची माहिती सरकारकडे नाही अन् आयोगाकडेही नाही. त्यामुळे आरक्षण मिळणार कसे, हा प्रश्‍न आहे. इम्पेरिकल डाटा तयार करण्याचे काम सरकारने अजूनही सुरू केले नाही. हा डाटा तयार करायला तीन महिन्यांपेक्षा जास्त वेळ लागत नाही. कारण आमच्या सरकारने तेव्हा मराठा आरक्षणासाठी इम्पेरिकल डाटा तयार केला होता. त्यामुळे मी हे ठामपणे सांगू शकतो. 

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत भाजप ताकदीने उभा राहणार
सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष ताकदीने उभा राहणार आहे. त्यासाठी आम्ही वेगळी तयारी करत नाही, तर नेहमी तयारच असतो. यावेळी आम्ही भारतीय जनता युवा मोर्चाची ताकद वाढविणार आहोत. त्यासाठी १८ ते २५ वर्ष वयोगटातील युवा वॊरिअर्स जोडत आहोत. प्रत्येक मतदान केंद्र आणि बूथ स्तरांवर २५ युवा वॊरिअर्स जोडण्याचे नियोजन केले आहे. या अभियानाची सुरुवात उत्तर महाराष्ट्रातून करत असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. 

हेही वाचा : सरकार पडेल असं रोज सकाळी वाटतं पण संध्याकाळ होईपर्यंत टिकतं!

या अभियानातून आम्ही ९७ हजार ६४१ मतदान केंद्रावर जाणार २५ लाख लोकांना युवा वॊरिअर्स म्हणून नेमणार आहोत. नाशिक मध्ये १४० शाखा उघडणार असून जिल्ह्यातील ५०० गावांत शाखा उघडणार आहोत. सुरुवातीला नगरसेवकांच्या संख्येनुसार आणि नंतर संपूर्ण शहरात नेमणूक केली जाणार आहे. सर्व आघाड्या युवा वॊरिअर्ससाठी काम करणार आहेत. त्यामध्ये सेल्फी विथ युवा वॊरिअर्स ही संकल्पना राबविण्याचेदेखील पक्षाने ठरवले आहे. यासाठी १ जानेवारी १९९७ च्या पुढे ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांची नेमणूक करणार असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. 
 Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख