केंद्र सरकार म्हणतंय, पूर्व विदर्भातील तांदूळ खाण्यायोग्य नाही; नानांचा खळबळजनक आरोप..

राजकारणामध्ये केंद्र आणि काही राज्य सरकारांमध्येही व्यापारी वृत्तीच्या लोकांचा शिरकाव झालेला आहे. त्यांच्यामुळेच धान उत्पादक शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झालेल्या आहेत. या अडचणींतून शेतकऱ्यांना बाहेर कसे काढायचे, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
Nana Patole
Nana Patole

भंडारा : पूर्व विदर्भाच्या East Vidarbha जिल्ह्यांतील शेतकरी पिकवत असलेला तांदूळ खाण्यायोग्य नाही, असे प्रमाणपत्र केंद्र सरकार दिले Certificate issued by the Central Government असल्याची माहिती कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Congress's state President Nana Patole यांनी आज दिली. आज त्यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. या आरोपाने नव्या वादाला तोंड फोडले आहे. भंडारा-गोंदीया जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मात्र त्यांच्या या वक्तव्याने धडकी भरली आहे. Farmers, however, are shocked by his statement भंडारा-गोंदीया जिल्ह्यांतील लोक, शेतकरी, कामगार जिल्ह्यात पिकविलेल्या धानाचा तांदूळ खात आहेत. अद्याप तरी जिल्ह्यातील लोकांना कोणतेही अपाय झाले नाहीत, असे पटोले Nana Patole म्हणाले. 

कोणत्या निकषांवरून पूर्व विदर्भातील १११ प्रकारचे धान खराब असल्याचे केंद्र सरकार म्हणत आहे, असा प्रश्‍न पटोले यांनी उपस्थित केला. केंद्र सरकारने दिल्लीत बसून महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांनी पिकवलेल्या धानाचे तांदूळ खाण्यायोग्य नाही, असे जे चित्र निर्माण केले आहे. त्याचे परिणाम पूर्व विदर्भातील शेतकरी आज भोगत आहेत. शेतकरी हवालदिल झाला आहे. पावसाळ्यात पिकविलेला धान अद्याप खरेदी केला गेला नाही. उन्हाळी धानही शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये आणि घराच्या अंगणात तसाच पडून आहे. पावसाळा तोंडावर आहे आणि असे असतानाही धानाची खरेदी सुरू झालेली नाही. जर का पाऊस आला तर या जिल्ह्यांतील शेतकरी पुरता डुबणार असल्याची भितीही नाना पटोले यांनी व्यक्त केली. 

राजकारणात व्यापारी घुसलेत...
राजकारणामध्ये केंद्र आणि काही राज्य सरकारांमध्येही व्यापारी वृत्तीच्या लोकांचा शिरकाव झालेला आहे. त्यांच्यामुळेच धान उत्पादक शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झालेल्या आहेत. या अडचणींतून शेतकऱ्यांना बाहेर कसे काढायचे, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. कुठल्याही परिस्थितीत आमच्या शेतकरी बांधवांचे नुकसान होऊ देणार नाही, असेही पटोले म्हणाले. 

ओबीसी आरक्षणातही गोंधळ...
तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने ओबीसी आरक्षणाच्या बाबतीतही मोठा गोंधळ घालून ठेवला आहे. राज्यातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम फडणवीस करत आहेत. आता महाविकास आघाडीच्या सरकारवर उठसूठ आरोप करणे, येवढेच काम त्यांना शिल्लक उरलेले दिसते. त्यांनी जर मनात आणले असते, तर हा तिढा केव्हाच सुटला असता. पण त्यांना ओबीसींना आरक्षण मिळू द्यायचे नाही, तर केवळ या मुद्यावर राजकारण करायचे आहे, अशा घणाघातही नाना पटोले यांनी केला. 
 Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com