राहुल गांधींना राष्ट्रीय नेता म्हटल्याचं बैलांनाही आवडलेलं दिसत नाही…

एमपीएससीच्या संदर्भात सरकार गंभीर नाहीये. स्वप्निल लोणकर यांच्या आत्महत्येनंतर ज्या पद्धतीने सरकार जागं व्हायला पाहिजे होतं, तसे झालेलं नाहीये. सरकार केवळ घोषणा करत आहे. पण घोषणा करून लोणकर यांच्या कुटुंबीयांना दिलासा देता येणार नाही.
Devendra Fadanvis at press conference with bawankule
Devendra Fadanvis at press conference with bawankule

नागपूर : महागाईच्या विरोधात कॉंग्रेसतर्फे केंद्र सरकारचा निषेध करीत सर्वत्र आंदोलन केले जात आहे. आज मुंबईत कॉंग्रेस नेते भाई जगताप Congress Leader Bhai Jagtap यांच्या नेतृत्वात बैलबंडीवर आंदोलन सुरू होते. दरम्यान बैलबंडी तुटली आणि नेते खाली पडले. या घटनेवरून विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis यांनी कॉंग्रेस नेत्यांवर निशाणा साधला. राहुल गांधींना राष्ट्रीय नेता म्हटल्याचं बैलांनाही आवडलेलं दिसत नाही, असा टोला फडणवीस यांनी हाणला. The bulls do not like rahul gandhi being called a national leader. 

आज येथील विमानतळावर पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले. कॉंग्रेसचे नेते बैलबंडीवर चढून आंदोलन करीत असताना बंडी तुटली आणि नेत्यांचा तोल गेला, ते खाली पडले. तरीही माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. राज्यात पाणी अडवण्याच्या बाबतीत राज्य सरकार आज जे काही सांगत आहे. ते निर्णय मी मुख्यमंत्री असतानाच घेतलेले आहेत. त्याचा डीपीआरही तेव्हा पूर्णत्वास आला होता. त्यामुळे तो डीपीआर निश्‍चित करून त्याचे टेंडर्स काढायचे आहेत. त्यामध्ये कुठलेही नवीन काम नाहीये. 

एमपीएससीच्या संदर्भात सरकार गंभीर नाहीये. स्वप्निल लोणकर यांच्या आत्महत्येनंतर ज्या पद्धतीने सरकार जागं व्हायला पाहिजे होतं, तसे झालेलं नाहीये. सरकार केवळ घोषणा करत आहे. पण घोषणा करून लोणकर यांच्या कुटुंबीयांना दिलासा देता येणार नाही. दुसरीकडे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल, असे एकही काम सरकारने अद्याप केलेले नाही. सरकारने पोकळ घोषणा न करता एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी ठोस काम करायला पाहिजे. पण या घटनेनंतरही घोषणांच्या पलीकडे सहकार गेलेले नाही, अशी टिका फडणवीस यांनी केली.

हरी नरकेंशी काय चर्चा करायची…
ओबीसी नेते हरी नरके यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात देवेंद्र फडणवीसांना खुली चर्चा करण्याचे आव्हान दिले आहे. यासंदर्भात विचारले असता, हरी नरकेंशी मी काय चर्चा करणार. पण त्यांचे बॉस म्हणजे छगन भुजबळ यांच्या चर्चा करायला मी केव्हाही तयार आहे. 

… तर त्यांनी निष्पक्षपणे काम करावे
नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात भास्कर जाधव तालिका अध्यक्ष होते. त्यानंतर त्यांनी विधानसभा अध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली. त्याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, समजा त्यांना विधानसभेचे अध्यक्षपद मिळालेही तरी त्यांनी निष्पक्षपणे त्या पदावर काम करावे आणि त्या पदाची उंची वाढवण्याचा प्रयत्न करावा. आघाडीमध्ये अध्यक्षपदाच्या निवडीबाबत एकमत असते तर आतापर्यंत त्यांनी अध्यक्षपदाची निवडणूक लावलीच असती. त्यांच्यात एकमत नसल्यामुळेच निवडणूक होऊ शकली नसल्याची टिकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com