ज्येष्ठ शिवसैनिक म्हणतात, संपर्कप्रमुखांच्या कानाखाली वाजवली; जिल्हाप्रमुखांचा नकार...

उदय सामंत साहेब वर्ध्यात आले असता त्यांना विधानसभा क्षेत्रातील समस्यांबाबत निवेदन देण्यासाठी आलो होतो. यावेळी संपर्क प्रमुखांनी जरा वरच्या सुरात संवाद साधला. यामुळे बाचाबाची झाली. यात संपर्क प्रमुखाला दोन कानशिलात दिल्या.
ज्येष्ठ शिवसैनिक म्हणतात, संपर्कप्रमुखांच्या कानाखाली वाजवली; जिल्हाप्रमुखांचा नकार...
Sarkarnama Banner

वर्धा : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत Higher and technical education minister Uday Samant काल येथे आले होते. त्यांना निवेदन देताना संपर्कप्रमुख माजी खासदार अनंत गुढे Former MP Anant Gudhe यांनी रोखून बाचाबाची केल्यामुळे त्यांच्या कानाखाली दोन लगावल्या असल्याचा दावा हिंगणघाट येथील शिवसैनिक सीताराम भुते Sitaram Bhute यांनी सांगितले. तर असा कोणताही प्रकार घडलाच नसल्याचा दावा जिल्हाप्रमुख प्रशांत शहागडकर District Chief Prashant Shahagadkar यांनी केला आहे. या घटनेनंतर मात्र जिल्ह्यात उलटसुलट चर्चांना ऊत आला आहे. 

शिवसेनेचे नेते उदय सामंत वर्ध्यात आले असता त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत विश्रामगृहात शिवसैनिकांत राडा झाला. एका गटाकडून शिवसेना संपर्कप्रमुखाच्या कानशिलात हाणल्याचा दावा केला जातो, तर दुसऱ्या गटाकडून संपर्क प्रमुखांसोबत काहीही घडले नसल्याचे म्हटले गेले आहे.

निवेदन देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्याने मास्क लवले नसल्याचे सांगण्यात आले आहे. याकरिता हटकल्यावरून हा वाद झाल्याचे बोलले जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत वर्ध्यात आले होते. विश्रामगृहात शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मंत्री सामंत यांची भेट घेतली. यावेळी हिंगणघाट येथील सीताराम भुते मंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आले. तेव्हा त्यांनी मास्क न लावल्याने त्यांना मास्क लावण्यासाठी संपर्क प्रमुख अनंत गुढे यांनी सांगितल्यानंतर वादाला सुरुवात झाल्याचे बोलले जात आहे. त्यावरून दोन गटांत चांगलीच बाचाबाची झाली. शिवीगाळही झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. यावेळी सीताराम भुते यांनी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अनंत गुढे यांना कानशिलात हाणल्याचा दावा केला.

सीताराम भुते मास्क लावून नसल्याने त्यांना हटकले असता बाचाबाची झाली. भुते यांनी चुकीचं वक्तव्य केल्याने त्यांना शिवप्रसाद दिल्याचे जिल्हा प्रमुखांचे म्हणणे आहे. संपर्क प्रमुखांशी काहीही झाले नाही. तेव्हा तेथे उपस्थित होतो. हा संपर्क प्रमुखांना बदनाम करण्याचा कट आहे.
- प्रशांत शहागडकर
जिल्हाप्रमुख  

उदय सामंत साहेब वर्ध्यात आले असता त्यांना विधानसभा क्षेत्रातील समस्यांबाबत निवेदन देण्यासाठी आलो होतो. यावेळी संपर्क प्रमुखांनी जरा वरच्या सुरात संवाद साधला. यामुळे बाचाबाची झाली. यात संपर्क प्रमुखाला दोन कानशिलात दिल्या.
- सीताराम भुते
शिवसेना कार्यकर्ता, हिंगणघाट
Edited By : Atul Mehere

Related Stories

No stories found.