अशोक शिंदे कॉंग्रेसमध्ये गेले, पण त्यांचा फोटो कुठे दिसला नाही...

पदाचा वापर मी पक्षवाढीसाठी केला. त्यामुळेच पक्षाने मला शेजारच्या वर्धा जिल्ह्याची जबाबदारी दिली, असे सांगतानाच शिंदेंनी आता नवीन घरात सुखी रहावे, असा सल्ला अनंत गुढे यांनी दिला.
Anant Gudhe
Anant Gudhe

नागपूर : नुकतेच कॉंग्रेसमध्ये गेलेल्या अशोक शिंदे Ashok Shinde यांना शिवसेनेने Shivsena भरभरून दिले. तीन वेळा आमदार केले, राज्यमंत्रीही बनवले. त्यांना पक्षनेतृत्वाने पक्षाचे उपनेतेपद दिले होते. विदर्भासाठी ते एकमेव उपनेते होते. तरीही त्यांनी काम केले नाही. तरीही त्यांना पक्षात मान होता. पण आता जेथे ते गेले, तेथे त्यांना मान मिळणार नाही. ते कॉंग्रेसमध्ये गेले, पण त्यांचा फोटो कुठे दिसला नाही, ashok shinde went to congress but his photo was nowhere seen  अशी उपरोधिक प्रतिक्रिया शिवसेना नेते माजी खासदार आणि वर्धा जिल्ह्याचे संपर्कप्रमुख अनंत गुढे Anant Gudhe यांनी दिली. 

‘सरकारनामा’शी बोलताना अनंत गुढे म्हणाले. शिंदेंपूर्वी अनेक जण शिवसेना सोडून गेले. त्यामध्ये छगन भुजबळ, नारायण राणे, सुबोध मोहितेंचा समावेश आहे. या नेत्यांसोबत त्यांचे लोकंही गेले, पण शिंदेंसोबत शिवसेनेचा एकही पदाधिकारी कॉग्रेसमध्ये गेला नाही. मोहिते कॉंग्रेसमध्ये गेले खरे, पण १५ वर्षांपासून ते इकडून तिकडे भटकत आहे. त्यांच्या राजकीय कारकीर्द अजूनही बहरली नाही. बाळासाहेब ठाकरेंना सांगितलेच होते की, ‘उडाले ते कावळे, अन् राहिले ते मावळे’, त्यामुळे कितीही जण शिवसेना सोडून गेले, तरी पक्षाला काही फरक पडलेला नाही. पक्ष आपला भगवा झेंडा आजही अभिमानाने फडकवतच आहे. 

झाडाचे एखादे फळ खाली पडले म्हणून झाडाला बाधा निर्माण होत नाही. आता शिवसेना वर्धा जिल्ह्यात अजून वाढणार आहे. नुकतेच भारतीय जनता पक्षाचे १० नगरसेवक शिवसेनेत आले. शिंदेंनी विदर्भात काय, पण वर्धा जिल्ह्यातही काम केले नाही. म्हणून पक्षाने संपर्क प्रमुख म्हणून माझी नियुक्ती केली आणि पक्षाच्या आदेशाप्रमाणे मी काम करत आहो. अमरावती जिल्ह्यातही माझे काम सुरू आहे. मी तीन वेळा खासदार राहिलो आणि पदाचा वापर मी पक्षवाढीसाठी केला. त्यामुळेच पक्षाने मला शेजारच्या वर्धा जिल्ह्याची जबाबदारी दिली, असे सांगतानाच शिंदेंनी आता नवीन घरात सुखी रहावे, असा सल्ला अनंत गुढे यांनी दिला. 

कोण हा सिताराम भुते ?
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत वर्धा येथे आले असताना सिताराम भुते यांच्यासोबत बाचाबाची आणि मारहाणीची घटना झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यावर बोलताना गुढे म्हणाले, तसा कुठलाही प्रकार झाला नाही. भुते हा शिवसैनिकही नाही. तो निवेदन द्यायला आला होता. तेथे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. पण हा पठ्ठा मास्क न घालता सुरक्षा रक्षकांशी हुज्जत घालत होता. सुरक्षा रक्षकांनाही तो आवरत नव्हता. म्हणून मग शिवसैनिकांना त्याला शिवप्रसाद दिला. वास्तविकतः भुते हा फ्रॉड आहे, प्लॉटच्या व्यवसायात त्याने अनेकांना लुबाडले आहे आणि संरक्षण हवे म्हणून तो शिवसेनेचा वापर करण्याचा प्रयत्न करतो. पक्ष मोठा होत असला की, असे लोक सुरक्षा मिळवण्यासाठी अशी कामे करतात, असेही अनंत गुढे म्हणाले. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com